रशियातील शाळेत अंदाधुंद गोळीबार; 7 मुलांसह 13 जणांचा मृत्यू

मध्य रशियातील इझेव्हस्क शहरातील एका शाळेत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये 7 मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या गोळीबारात दोन सुरक्षा रक्षक, दोन शिक्षक तसेच सात अल्पवयीन मुलांसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या गृहमंत्र्यांनी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात बंदूकधार्याने शाळेत घुसून अचानक गोळीबार केला. बंदूकधाऱ्याने सुरक्षा रक्षकाचीही हत्या केली. गोळीबाराची घटना घडल्यानंतर बंदूकधाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून हत्या केली. हल्लेखोराचा मृतदेह सापडला आहे.

रशियाच्या तपास समितीने सांगितले की, हल्लेखोराने आत्महत्या करण्यापूर्वी 13 जणांची हत्या केली. मृतांमध्ये 7 जणं, 2 शिक्षक आणि 2 सुरक्षा रक्षकांचाही समावेश आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हा गुन्हा करण्यामागचं कारण काय, याबाबतची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही. तसेच हल्लेखोराची ओळखही पटलेली नाहीये. ती शाळा रिकामी करण्यात आली असून आजूबाजूच्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत रशियातील शाळांमध्ये गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात काझान येथील शाळेत एका अल्पवयीन मुलाने 7 मुलांसह 9 जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. यावर्षी एप्रिल महिन्यात बालवाडीमध्ये घुसून 2 मुलं आणि एका शिक्षकाची हत्या बंदुकधारी व्यक्तीने केली होती. या घटनेनंतर आरोपीने आत्महत्या केली.


हेही वाचा : ‘पीएफआय’वरील कारवाईवर विरोधकांचे मौन का?, केशव उपाध्ये यांचा सवाल