अमेरिकेत प्राण्यांनाही कोरोनोची लस

अमेरिकेत प्राण्यांनाही कोरोनोची लस

अमेरिकेत प्राण्यांनाही कोरोनोची लस

अमेरिकेत कोरोना काळात माणसे बिकट परिस्थितीचा समाना करत असतानाच अमेरिकेतील प्राणी देखील कोरोनाच्या विळख्यात आले होते. त्यामुळे अमेरिकेने आता माणसांप्रमाणेच प्राण्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्याचे ठरवले आहे. माणसांप्रमाणेच आता प्राण्यांना देखील कोरोना विरोधी लस देण्यास सुरुवात झाली आहे. (Corona-19 vaccine for animals tigers and bears okland zoo in in United States) अमेरिकेच्या सॅन फ्रान्सीस्को येथील ऑकलँड (Oakland) प्राणीसंग्रहालयात प्राण्यांना कोरोना लस देण्यात येत आहेत. या प्राणीसंग्रहालयातील अस्वल आणि वाघांना कोरोना लस देण्यात आलीय. टायगर जिंजर आणि मोली या दोन प्राण्यांना पहिल्यांदा लस देण्यात आली होती. या प्राण्यांमध्ये कोरोनाशी निगडीत कोणतीही लक्षणे नव्हती मात्र तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांना लस देण्यात आली. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या सॅन दिएगो प्राणीसंग्रहालात काही गोरिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्याआधी वाघ आणि मिंक यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

न्यू जर्सी येथे असणाऱ्या अॅनिमल हेल्थ कंपनी Zoetis ने प्राण्यांसाठी ही लस केली आहे. प्राण्यांना कोरोना लसीकरणासाठी Zoetis कंपनीने जवळपास २७ राज्यांत असणाऱ्या ७० प्राणीसंग्रहालसाठी ११ हजार लसींचे डोस उपलब्ध करुन देणार आहे. Zoetis कंपनीने प्राण्यांसाठी तयार केलेली कोरोना विरोधी लस पहिल्यांदा वाघ, ग्रिजली अस्वल,वाघ आणि फॅरेट्स (मुंगूसाची एक जात) या प्राण्यांना कोरोना विरोधी लस देण्यात येणार आहे.

Zoetis कंपनीच्या वरिष्ठ उपाध्याक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा हॉगकॉगमध्ये एका पाळीव कुत्रा कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले. त्यानंतर कंपनीने पाळीव प्राण्यांसाठी कोरोना विरोधी लस तयार करण्यात सुरुवात केली होती. तब्बल ८ महिने अभ्यासकरून ही लस जागतिक आरोग्य संघटनेकडे सादर करण्यात आली.

 


हेही वाचा – दिलासा! कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण एका आठवड्यात ३२ टक्क्यांनी घटले, संसर्गही ११ टक्क्यांनी झाले कमी

 

 

 

First Published on: July 5, 2021 12:46 PM
Exit mobile version