दिलासा! कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण एका आठवड्यात ३२ टक्क्यांनी घटले, संसर्गही ११ टक्क्यांनी झाले कमी

प्रातिनिधीक फोटो

देशातील कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने सर्वच हैरान झाले आहे. गेल्या एका आठवड्यातील आकडेवारी बघता महामारीदरम्यान दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दर १० लाख लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्ग होणाऱ्यांची संख्या आणि कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी होत आहेत. यासोबतच नव्या रूग्णांचे निदान होण्याच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्या वाढतेय तर सक्रिय रूग्णांत देखील घट होताना दिसतेय.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, गेल्या सात दिवसांत देशात कोरोना संक्रमणामुळे ६ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर मागील सात दिवसांत हा आकडा ९ हजारांवर होते. म्हणजे ही आकडेवारी पाहता मृतांच्या प्रमाणात ३२ टक्क्यांनी घट झाले आहे. तसेच, एका आठवड्यात कोरोना संक्रमण झालेले ३ लाख १२ हजार १६५ रुग्ण आढळले, तर मागील सात दिवसांत ३ लाख ५० हजार ९६८ रुग्ण आढळले होते. त्यामुळे याप्रमाणात ११ टक्क्यांनी घट झाले आहे. येत्या आठवड्यातील हा दर १० लाख लोकसंख्येमध्ये २२४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे नोंदवले गेले आणि चार जणांचा मृत्यू झाला. मागील आठवड्याच्या तुलनेत, २८ जणांना कोरोनाची बाधा झाली तर मृ्त्यूचा आकडा 2 जणांची घटल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत ४३ हजार ०७१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या रविवारी ५२ हजार २९९ वर पोहचली आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. देशातील एकूण बाधितांचा आकडा हा ३ कोटी ०५ लाख ४५ हजार ४३३ झाला आहे. तर रविवारपर्यंत २ कोटी ९६ लाख ५८ हजार ०७८ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील अॅक्टिव्ह रुग्णंची संख्या ४ लाख ८५ हजार ३५० झाली आहे. तर, रविवारपर्यंत देशात ४ लाख ०२ हजार ०५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे