Corona Cases In India Update: दिलासादायक! १२ दिवसांनंतर देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट!

Corona Cases In India Update: दिलासादायक! १२ दिवसांनंतर देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट!

औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक! २ दिवसांत १८ कोरोना रुग्णांचा मृत्यू

देशात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पण आज तब्बल १२ दिवसांनंतर देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मागील २४ तासांत देशात ४० हजार ७१५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १९९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच २९ हजार ७८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

४ कोटींहून अधिक जणांनी घेतली कोरोनाची लस

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ कोटी १६ लाख ८६ हजार ७९६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६० हजार १६६ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ११ लाख ८१ हजार २५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३ लाख ४५ हजार ३७७ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ कोटी ८४ लाख ९४ हजार ५९४ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

देशातील ‘या’ पाच राज्यातील कोरोना प्रादुर्भाव अधिक

देशात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५ लाख पार कोरोनाबाधितांचा आकडा झाला आहे. तर केरळमध्ये ११ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.


हेही वाचा – लॉकडाऊन बाबत २ दिवसांत निर्णय होणार, आरोग्य सेवेत भरती करण्याचे आदेश – राजेश टोपे


 

First Published on: March 23, 2021 10:56 AM
Exit mobile version