घरमुंबईलॉकडाऊन बाबत २ दिवसांत निर्णय होणार, आरोग्य सेवेत भरती करण्याचे आदेश -...

लॉकडाऊन बाबत २ दिवसांत निर्णय होणार, आरोग्य सेवेत भरती करण्याचे आदेश – राजेश टोपे

Subscribe

तीन महिन्यात कोरोना लसीकरण पुर्ण करणार

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास लॉकडाऊन करावा लागणार असल्याचे सांगितले आहे. राज्यातील मुंबई,पुणे आणि नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चिंताजनक परिस्थिती उद्भवली आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि इतर अधिकाऱ्यांना कोरोना निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश व्हिसीद्वारे आदेश देण्यात आले आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गर्दी जमवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोरोना रोखण्यासाठी ट्रॅकिंग, ट्रेसींग आणि टेस्टींगवर भर देण्यात आला आहे. कोरोना चाचण्या वाढवल्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रामंवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे सर्वच नागरिकांनी मास्क लावणे आवश्यक आहे. तसेच सर्वांनीच कोरोना नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात कोरोना लसीकरणामध्ये वाढ करण्यात आली आहे. एकूण ४५ लाख जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. तर पुढील ३ महिन्यात कोरोना लसीकरण पूर्ण करणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. सुरुवातीला १०० बेड असणाऱ्या रुग्णालयांना कोरोना लस देण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु केंद्राला विनंती करुन ज्या रुग्णालयात कोल्ड स्टोरेज आणि संबंधित व्यवस्था उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयांना देखील कोरोना लस देण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच राज्यात ३०० ठिकाणी कोरोनावरील लस देण्यात येत आहे.

- Advertisement -

एकूण ६०० खासगी रुग्णालयात कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेत मोठी भरती करण्याचे आदेश दिले आहेत. जिथे गरज असेल तिथे आरोग्या सेवकांची भरती करा असे आदेश दिले असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. सर्व महानगरमध्ये पुरेश्या प्रमाणात बेड आहेत. त्यामुले कोरोना रुग्णा वाढले तरी कुठेही सहज बेड उपस्थित होईल.

कोरोना लसीकरणात वाढ करण्यासाठी केंद्राकडे विनंती केली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला कोरोना लस त्यांच्या जवळच्या उपकेंद्रात मिळावी यासाठी उपकेंद्रात कोरोना लस उपलब्ध करण्याची तरतूद करण्यात येत असल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -