Corona Crisis: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ६२४ डॉक्टरांचा मृत्यू, IMAची माहिती

Corona Crisis: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ६२४ डॉक्टरांचा मृत्यू, IMAची माहिती

Corona Crisis: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ६२४ डॉक्टरांचा मृत्यू, IMAची माहिती

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देश कोलमडून गेला आहे. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आहे ती म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत तब्बल ६२४ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. ((Corona Crisis: Second wave of corona kills 624 doctors IMA reports) )  इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) ताज्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे. IMAच्या कोरोना रजिस्ट्रेशनुसार, दिल्लीत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत देशभरात ७४८ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात १ लाख ३४ हजार १५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधितांची संख्या ही २ कोटी ८४ लाख ४१ हजार ९८६ इतकी झाली आहे.

देशात गेल्या २४ तासात २ लाख ११ हजार ४९९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशातील रिकव्हर होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ६३ लाख ९० हजार ५८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, २ जून रोजी ३५ कोटी ८२ हजार ६४८ चाचण्या करण्यात आल्या. त्यातील २१ लाख५९ हजार ८७३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. त्याचप्रमाणे देशात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत २२ कोटी १० लाख ४३ हजार ६९३ लोकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.


हेही वाचा – आता Serum तयार करणार Sputnik V लस, DCGI कडे मागितली परवानगी

First Published on: June 3, 2021 4:46 PM
Exit mobile version