Corona India Update: देशात आज कोरोनाचे 22,270 नवे रुग्ण, पॉझिटिव्हीटी रेट 2 टक्क्यांपेक्षा कमी

Corona India Update: देशात आज कोरोनाचे 22,270 नवे रुग्ण, पॉझिटिव्हीटी रेट 2 टक्क्यांपेक्षा कमी

Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट; 4184 नवे रुग्ण, 104 मृत्यू

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे 1 लाखांच्यावर पोहचलेली संख्या आता 30 हजारांपेक्षाही कमी झाली आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 22,270 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्याचवेळी कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 2 टक्क्यांनी खाली पोहोचला आहे. त्यामुळे कालच्या तुलनेत रुग्णसंख्या 14 टक्क्यांनी घटली आहे.

सध्या देशात 2,53,739 अॅटिव्ह रुग्ण आहेत. तर रिकव्हरी रेट सध्या 98.21 टक्के आहे. गेल्या 24 तासात देशात 60,298 रुग्ण कोरोनापासून बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे कोरोनामधून बरे होणाऱ्या लोकांची संख्या 4,20,37,536 झाली आहे.

डेली पॉझिटिव्हीटी रेट 1.80 टक्के झाला आहे. त्याच वेळी वीकली पॉझिटिव्हीटी रेट 2.50 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनामुळे 325 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 75.81 कोटी कोराना चाचणी झाली आहे. गेल्या 24 तासात 12,35,471 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, शुक्रवारी एकाच दिवसात देशात कोरोनाचे 25,920 नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4,27,80,235 झाली आहे. यासह 43 दिवसांनंतर देशात कोविड -19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या तीन लाखांपेक्षा कमी झाली आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत सरकार जनतेला कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वतोपरी पालन करण्याचे आवाहन करत आहे. लोकांना घराबाहेर पडताना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. यासोबतच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यावरही भर दिला जात आहे.


shiv jayanti 2022 : पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना मानवंदना; शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा


First Published on: February 19, 2022 10:12 AM
Exit mobile version