CoronaVirus: पोलीसाने जिल्हाधिकाऱ्याला लॉकडाऊनचे दिले धडे!

CoronaVirus: पोलीसाने जिल्हाधिकाऱ्याला लॉकडाऊनचे दिले धडे!

CoronaVirus: पोलीसाने जिल्हाधिकाऱ्याला लॉकडाऊनचे दिले धडे!

जिल्हाधिकारी हा आपल्या जिल्ह्याचा सर्वेसर्वा असतो. पोलिस देखील जिल्हाधिकाऱ्याला सेल्युट ठोकतात. मात्र एका पोलीसाने चक्क जिल्हाधिकाऱ्याला लॉकडाऊनचे उल्लघंन केल्यामुळे झापलं आणि त्याने लॉकडाऊन पालन न केल्यामुळे कायदेशीर कारवाई आणि शिक्षा काय आहे हे देखील सांगितलं. उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये ही घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री मोटर सायकलवरून रामपूरचे जिल्हाधिकारी आपल्या कर्मचाऱ्यासोबत शहराची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळेस त्यांनी कोणालाही आपली ओळख पटू नये यासाठी त्यांना हॅल्मेट घातले होते. त्यांनी कुटुंबातील सदस्यां व्यतिरिक्त कोणालाही ते शहराची पाहणी करायला जाणार आहेत याबाबत सांगितलं नव्हतं.

घराबाहेरील पोलिस देखील त्यांना ओळखू शकले नाहीत. मोटर सायकलवरून त्यांनी रामपूर मधील ज्वाला नगर, अजीत पूर, कोसी नदी पूर, मिस्टर गंज, शाहबाद गेट आदि सर्व भागांची त्यांनी पाहणी केली. आपल्याचं जिल्ह्यात मध्यरात्री लॉकडाऊनदरम्यान जिल्हाधिकारी मोटर सायकलवरून दोन तास फिरत होते. यादरम्यान त्यांना दोन चेकींग पाँइटवर थांबवलं. शहरातील काही भागात लॉकडाऊन नियम धाब्यावर बसवलेले दिसले. मात्र त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना टोकले नाही. फक्त त्यांनी त्या भागांची नाव लक्षात ठेवली.

मात्र जिल्हाधिकारी पाहणी करताना एका पोलीस कर्मचाऱ्याने एलआयसी क्रॉसरोडवर त्यांना थांबवलं. त्यावेळेस त्याने जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊनचे महत्त्व समजावून सांगितलं. तसंच त्याने लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं.

याबाबत रामपूरचे जिल्हाधिकारी म्हणाले, सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मी त्या पोलीस कर्मचाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यलयात फोन करून बोलावले. मी त्याचे कौतुक करत त्याला एक प्रमाणपत्र दिले. जेणेकरून जिल्ह्यात तैनात असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रामणिकपणा आणि परिश्रम करण्याची इच्छा निर्माण होईल.


हेही वाचा – CoronaVirus: मुंबईत २४ तासात २१७ नवे रुग्ण, आकडा १३९९वर!


 

First Published on: April 12, 2020 9:33 PM
Exit mobile version