CoronaVirus: मुंबईत २४ तासात २१७ नवे रुग्ण, आकडा १३९९वर!

217 found new corona positive patient in mumbai
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईमध्ये रविवारी तब्बल २१७ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने बाधितांचा आकडा १३९९ वर पोहचला आहे. तीन दिवसांपासून मुंबईमध्ये सातत्याने २०० पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. तसेच रविवारी मुंबईत कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ९१ वर पोहचला आहे.

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना शुक्रवारपासून मुंबईत सातत्याने २०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. रविवारी मुंबईत तब्बल २१७ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १३९९ वर पोहचली आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मृतांच्या संख्येतही रविवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारी १६ जणांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील मृतांचा आकडा ९१ वर पोहचला आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत २६ रुग्ण बरे झाले असून हॉस्पिटलमधून घरी पाठवलेल्या रुग्णांची संख्या ९७ वर पोहचली आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.

महापालिका आणि खासगी संस्थांच्या डॉक्टरांसाठी पालिकेने वेबिनारद्वारे घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाद्वारे २४५० फिजीशीयन्स आणि १२ प्राध्यापक तज्ज्ञ सहभागी झाले होते.


हेही वाचा – CoronaVirus: मुंबईकरांना अखंडित विदयुत सेवा देणारे कर्मचारी दुर्लक्षित