corona: omicron च्या 9 सब व्हेरिएंटचा दिल्लीत हैदोस! जीनोम सिक्वेसिंगमधून मोठा खुलासा

corona: omicron च्या 9 सब व्हेरिएंटचा दिल्लीत हैदोस! जीनोम सिक्वेसिंगमधून मोठा खुलासा

दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे. मात्र वेगाने वाढणाऱ्या या कोरोना रुग्णसंख्येमागे ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सब व्हेरिएंट जबाबदार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत कोरोनाच्या वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमागे ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 9 सब व्हेरिएंट जबाबदार आहेत. कारण दिल्लीत जीनोम सिक्वेंसिंगमध्ये ओमिक्रॉनच्या BA.2.12.1 सह 9 सब व्हेरिएंटची पुष्टी झाली आहे.

दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या सतत वाढत असून गेल्या 24 तासात राजधानीत कोरोनाचे 1009 रुग्ण आढळून आले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिल्लीत कोरोनाचे 601 रुग्ण आढळले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढीचा वेग वाढतच आहे. दिल्लीत कोरोना संक्रमणाचा दर 5.70 टक्क्यांवर पोहचला आहे. तर 314 रुग्ण कोरोनामुरक्त होत घरी परतले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे दिल्लीत 10 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा रुग्णसंख्या 1 हजारांच्या पार गेली होती.

10 फेब्रुवारी रोजी दिल्लीत 1104 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र रुग्णसंख्या जरी वाढत असली तरी कोरोना टेस्टिंगचे प्रमाण अद्याप वाढवण्यात आले नाही. बुधवारी दिल्लीत केवळ 17701 कोरोना टेस्ट करण्यात आल्या. तर आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या केवळ 9581 इतकी होती. त्यामुळे दिल्लीत कोरोना चाचण्या वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.


दुकानदाराची एक चुक ग्राहकाला फळली, ६ कोटींची लॉटरी लागली

First Published on: April 21, 2022 3:51 PM
Exit mobile version