दुकानदाराची एक चुक ग्राहकाला फळली, ६ कोटींची लॉटरी लागली

man wins 6 crore rupees thanks to shop assistants mistake
दुकानदाराची एक चुक ग्राहकाला फळली, ६ कोटींची लॉटरी लागली

कोणाचे नशीब केव्हा आणि कोणामुळे बदलेलं सांगता येत नाही. अशाच एक प्रकार एका व्यक्तीच्या बाबतीत घडला आहे. लॉटरी टर्मिनल क्लार्कच्या एका चुकीमुळे या व्यक्तीने तब्बल 6 कोटींहून अधिक रुपयांची लॉटरी जिंकली आहे. यासाठी त्याने लॉटरी टर्मिनलच्या क्लार्कचे आभार मानले आहेत. क्लार्कच्या चुकीमुळेत एवढी मोठी लॉटरी लागल्याचे त्याचे मत आहे.

जोश बस्टर असे या लॉटरी लागलेल्या व्यक्तीचे नाव असून हे प्रकरण अमेरिकेतील आयोवा प्रांतात घडले आहे. जोश शुक्रवारी रात्रीच्या मेगा मिलियन्स ड्रॉसाठी तिकिट घेण्यासाठी लॉटरी टर्मिनलवर पोहोचला. तेथे त्याने 5 नंबर देण्याची मागणी केली. मात्र चुकून दुकानदाराने तिकिटावर एका तिकिटवर एकचं नंबर प्रिंट केला, नंतर त्याने एका दुसऱ्या तिकिटवर बाकीचे चार नंबर छापून दिले. दुकानदाराच्या या चुकीमुळेच त्याला लॉटरी लागल्याचे जोश याचे मत आहे.

जोश म्हणाला की, क्लार्लने चूक केली नसती आणि एका तिकिटावर सर्व अंक प्रिंट झाले असते. त्यामुळे त्या नंबरमध्ये अंतर राहिले नसते. जोश यावर पुढे सांगतो, मी कामावर जाण्यासाठी सकाळी लवकर उठलो. यानंतर मी लॉटरी अॅप ओपन केले आणि माझा विनर नंबर शोधला. मी माझी तिकिटे नेहमी कारच्या कन्सोलमध्ये ठेवतो. आणि मी कारमध्येच लॉटरी विजेत्यांची नावे चेक केली. त्यानंतर मी धावतच घरात गेलो. सुरवातीला माझा विश्वासच बसेना. कारण सहसा माझे नशीब कधीच चांगले नसते.

यानंतर जोशने त्याची बक्षीस रक्कम क्लाइव्ह येथील लोवा लॉटरी हेडक्वार्टर्समधून घेतली. लोवा लॉटरीने अहवाल दिला की, जोशने त्याचे तिकीट वेस्ट बर्लिंग्टन येथील एमके मिनी मार्टमधून खरेदी केले होते. जोशला फक्त 124 कोटी रुपयांच्या जॅकपॉट नंबरमधून पहिले 5 नंबर मिळत होते. त्यामुळेच त्याला मेगा बक्षीस मिळाले नाही आणि त्याला फक्त 6 कोटी रुपये मिळाले. यावर जोश म्हणाला की, या पैशाने माझ्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतील. आता सर्व आर्थिक चिंता संपल्या आहेत.


झारखंडमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना, डझनभर मजुर जमिनीखाली