Live Update: किरीट सोमय्या उद्या राज्यपालांची भेट घेणार

Live Update: किरीट सोमय्या उद्या राज्यपालांची भेट घेणार

Live update Mumbai Maharashtra

भाजप नेते किरीट सोमय्या उद्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेणार
राज्यात आज दिवसभरात ६ हजार ४३६ नवे कोरोनाबाधित आढळले असून २४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १८ हजार ४२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६ हजार ५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात एका शिवसैनिकाला अटक
मुंबईत गेल्या २४ तासांत ३५६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ०५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत ५ हजार १३९ सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान काँग्रेसने मुंबईतील स्थलांतरित मुजरांना मोफत तिकिटे दिली – पंतप्रधान मोदी
देशभरात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार – पंतप्रधान मोदी
लतादीदींचे भारतात मोठे योगदान आहे. देशाने आदरणीय लतादीदींना गमावले. देशाला लतादीदींच्या आवाजाने प्रेरणा दिली आहे.- पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत लतादीदींना श्रद्धांजली वाहली
अभिभाषणाच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह
थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेतून लाईव्ह येणार असून अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान मोदी बोलणार आहेत.
आम्ही REETची दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा रद्द करत आहोत, आम्ही पुन्हा या परीक्षेचे नियोजन करू, अशी माहिती राजस्थान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लतादीदींच्या प्रभूकुंज निवासस्थानी दाखल
भाजप आमदार नितेश राणे कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल
राज्यसभेचे कामकाज 8 फेब्रुवारीपर्यंत तहकूब
असदुद्दीन ओवैसींच्या हल्लाबाबत गृहमंत्री अमित शाह यांच राज्यसभेत निवेदन
आमदार नितेश राणेंना घेऊन पोलीस कोल्हापूरच्या दिशेने रवाना
आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग रुग्णालयाबाहेर आणले, आज जामीन अर्जावर मात्र सुनावणी नाही
ममता बॅनर्जी आजपासून उत्तरप्रदेशात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेला करणार संबोधित

यावेळी पंतप्रधान लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देणार आहेत
लोकसभा कामकाज संध्याकाळी 4 वाजता सुरू होणार

पुणे विद्यापीठाच्या शांतिश्री पंडित बनणार दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठाच्या कुलगुरू जेएनयूला पहिल्यांदाच महिला कुलगुरू
आदिनाथ मंगेशकर लतादीदींच्या अस्थी घेऊन प्रभुकुंजच्या दिशेने रवाना
आदिनाथ मंगेशकर लतादीदींच्या अस्थी घेण्यासाठी छ.शिवाजी महाराज पार्कमध्ये हजर
मिलिंद नार्वेकर छ.शिवाजी महाराज पार्कमध्ये हजर, लतादीदींच्या अस्थी प्रभुकुंजवर घेऊन जाणार
भारतीयांना मंत्रमुग्ध करणारा आवाज हरपला, संसदेत लतादीदींना वाहिली श्रद्धांजली राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी दिग्गज गायिका लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली लतादीदींच्या निधनाने एका युगाचा अंत झाला, त्यांच्या जाण्याने संगीत विश्वातील निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणार आहे. असं एम व्यंकय्या नायडू म्हणाले.
देशात 83 हजार 876 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

दशावतारातील लोकराजा सुधीर कलिंगण यांचं निधन

वयाच्या 49 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गोव्यातील खासगी रुग्णालयात आज पहाटे 3 :00 वाजता उपचारादरम्यान झाले निधन
आदिनाथ मंगेशकर आज सकाळी 10.30 वाजता लतादीदींच्या अस्थी प्रभुकुंजवर घेऊन जाणार
लतादीदींच्या निधनामुळे केंद्र सरकारकडून 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
स्पुतनिकच्या सिंगल डोसच्या वापराला परवानगी, DCGI ने दिली परवानगी
राज्यात आज सार्वजनिक सुट्टी मात्र शेअर मार्केट राहणार सुरु
महाराष्ट्र राज्य तंत्र मंडळाची परीक्षा आज घेण्यात येणार होती, परंतु, लता मंगेशकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्र शासनाने आज राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे  येत्या 10 फेब्रुवारी 2022 रोजी त्याच वेळेत घेण्यात येणार आहे.
 
First Published on: February 7, 2022 8:21 PM
Exit mobile version