Omicron Threat: दक्षिण आफ्रिकेतून नाही तर युरोपमधून पसरला ओमिक्रॉन; नवा खुलासा

Omicron Threat: दक्षिण आफ्रिकेतून नाही तर युरोपमधून पसरला ओमिक्रॉन; नवा खुलासा

कोरोना महामारीच्या लढाईदरम्यान नव-नवीन व्हेरियंट येऊन जगाची चिंता वाढवत आहेत. डेल्टा व्हेरियंटनंतर आता ओमिक्रॉन व्हेरियंटची दहशत जगभरात पसरली आहे. दक्षिण आफ्रिकेतून ओमिक्रॉन पसरल्याचे बोलले जात आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेपूर्वीचे दोन देशांनी ओमिक्रॉन केस आढळल्याचे सांगितले आहे. ओमिक्रॉन हा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेतून नाही तर युरोपमधून पसरल्याचा नवा खुलासा झाला आहे. नेदरलँडच्या आरआयवीएम आरोग्य संस्थेने १९ आणि २३ नोव्हेंबरला नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन आढळल्याची माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते की, दक्षिण आफ्रिकेने सर्वात पहिल्यांदा २४ नोव्हेंबरला ओमिक्रॉन आढळल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेला दिली. पण नवीन व्हेरियंट कसा आणि कुठून पसरला आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु ओमिक्रॉनने पुन्हा एकदा देशांना निर्बंध लादण्यास भाग पाडले आहे. खासकरून अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेने नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान भारतात अजूनपर्यंत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही, अशी माहिती काल केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे मांडविया म्हणाले. तरी देखील सावध होऊन आजपासून केंद्र सरकारच्या सुधारित गाईडलाईन्सची अंमलबजावणी झाली आहे. तसेच ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सहा उपाय सांगितले आहेत.


हेही वाचा – Omicron Variant Guidelines: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुधारित गाईडलाईन्सची आजपासून अंमलबजावणी


 

First Published on: December 1, 2021 11:19 AM
Exit mobile version