Live Update: भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी उद्या पहाटे ४ वाजता C-17 विमान रोमनियाला रवाना होणार

Live Update: भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी उद्या पहाटे ४ वाजता C-17 विमान रोमनियाला रवाना होणार

Live update Mumbai Maharashtra

युक्रेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाचे C-17 विमान उद्या पहाटे 4 वाजता रोमानियाला रवाना होणार आहे. विमान दिल्लीजवळील हिंडन विमानतळावरून उड्डाण करेल, अशी माहिती IAF अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन उद्या संध्याकाळी ७.३० वाजता संबोधित करणार
राज्यमंत्री मंडळाची बैठक बुधवारी साडे पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहावर
केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह पोलंडा पोहोचले. ८० विद्यार्थ्यांसोबत व्ही.के सिंह यांची चर्चा
गेल्या २४ तासांत मुंबईत ७७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली नाही. तसेच १३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या मुंबईत ७५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतून रशियाला बाहेर काढण्याची मागणी ब्रिटनने केली आहे.
युक्रेन आता युरोपियन युनियनचा सदस्य होणार आहे. युक्रेनचा अर्ज युरोपियन युनियनने स्वीकारला.
थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उच्चस्तरीय बैठकीला सुरुवात होणार
युक्रेनमधील बॉम्बहल्ल्यात मृत्यू झालेल्या नवीनच्या वडिलांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपर्क साधला.
रशिया आणि युक्रेनमध्ये उद्या चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशात उद्या पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे.
युक्रेनमधील बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

भारतीयांनी तात्काळ युक्रेनचं कीव शहर सोडा, केंद्र सरकारने नव्या अॅडव्हायजरीमधून सुचना

रशिया युक्रेनमधील युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता


युक्रेन- रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक
आगामी आयपीएल सामान्यांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यावरण मंत्री तसेच मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 2 मार्च रोजी सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक पार पडणार आहे.
भारतात आज 6,915 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 180 रुग्णांचा मृत्यू, 16,864 रुग्ण कोरोनामुक्त
केंद्रीय तपास यंत्रणांना फक्त महाराष्ट्रातचं काम- संजय राऊत
‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत सातवं विमान मुंबईत दाखल , केंद्रीय मंत्री नारायण राणे भारतीयांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहचले
महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरातील शिव मंदिरं सजली, अनेक ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची रीघ
महाशिवरात्री निमित्ताने कुणकेश्वर मंदिराला आकर्षक सजावट दर्शनासाठी भाविकांची रात्रीपासून गर्दी
UNHRC तल्या चर्चेच्या मतदानातून भारत पुन्हा गैरहजर, 29 देश युक्रेनच्या बाजूने
First Published on: March 1, 2022 10:34 PM
Exit mobile version