CoronaVirus : इराणमध्ये अडकलेले २७७ भारतीय विशेष विमानाने परतले!

CoronaVirus : इराणमध्ये अडकलेले २७७ भारतीय विशेष विमानाने परतले!

जगभरात आता पसरलेल्या करोना व्हायरसनं इराणमध्ये अक्षरश: थैमान घातलं आहे. आत्तापर्यंत इराणमध्ये २१ हजारहून जास्त नागरिकांना करोनाची लागण झाली आहे, तर तब्बल १६००हून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या ५०० भारतीय विद्यार्थी आणि यात्रेकरूंना परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले होते. सर्व प्रकारची आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द झाल्यामुळे हे सर्वजण इराणमध्येच अडकून पडले होते. मात्र, आता यातल्या २७७ जणांना विशेष विमानाने पुन्हा भारतात आणण्यात आलं आहे. आज पहाटेच्या सुमारास या २७७ भारतीय प्रवाशांचं विमान तेहरानहून दिल्ली विमानतळावर दाखल झालं. या सर्वांची तपासणी करून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्यापैकी कुणाला करोनाची लागण झाली किंवा नाही, याविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

 

दरम्यान, ज्या प्रकारे इराणमध्य अडकलेल्या भारतीयांना विशेष विमानाने परत आणण्यात आलं, त्याचप्रकारे भारतात अडकलेल्या ३८८ रशियन नागरिकांना देखील विशेष विमानाने परत रशियाला पाठवण्यात आलं आहे.


CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये काय सुरू काय बंद? गोंधळ उडालाय? इथे वाचा!
First Published on: March 25, 2020 9:58 AM
Exit mobile version