Corona : देशात पाच ठिकाणी होणार लसीच्या शेवटच्या मानवी चाचणीचे परिक्षण

Corona : देशात पाच ठिकाणी होणार लसीच्या शेवटच्या मानवी चाचणीचे परिक्षण

लस

जगभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असतानाच गेल्या सहा आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. अशात ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका द्वारा विकसित कोविड -१९ लसीच्या (Oxford-AstraZeneca COVID-19 vaccine) मानवी चाचणी करण्यात येत असून ती अंतिम टप्प्यात देशभरात पाच ठिकाणी पूर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती जैव तंत्रज्ञान विभाग (DBT) च्या सचिव रेणू स्वरूप यांनी काल दिली.

लस तयार झाल्यानंतर ऑक्सफोर्ड (Oxford) आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) यांनी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया- एसआयआय’ (Serum Institute of India- SII) ची निर्मिती केली आहे. त्यानुसार, या महिन्याच्या सुरूवातीला प्रथम दोन-टप्प्यातील चाचणी निकाल सादर करण्यात येणार आहे.

ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीने तयार केलेल्या लशीच्या पहिल्या दोन चाचणी यशस्वी झाल्या आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात मुंबई-पुण्यादरम्यान ५ हजार लोकांवर मानवी चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती सीरम कंपनीच्या सीईओंनी दिली. त्यानंतर आता दुसरी आनंदाची बातमी म्हणजे भारतीय बनावटीची Covaxin या लसीला मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात चांगलं यश मिळाले आहे.

ICMR-भारत बायोटेक कंपनीने एकत्र येऊन Covaxin ही लस तयार केली आहे. एम्स रुग्णालयात Covaxin लशीची चाचणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात संस्थेला १०० स्वयंसेवकांची चाचणी घ्यावी लागते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली एम्सच्या चाचणीत भाग घेण्यासाठी सुमारे ३ हजार ५०० लोकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक लोक दुसऱ्या राज्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा –

रिक्षाचे स्टिअरिग मुख्यमंत्र्यांच्या हातात;पण कु ठे जायचे हे मागे बसलेले ठरवतात

First Published on: July 28, 2020 7:41 AM
Exit mobile version