नातेवाईकाच्या चुकीमुळे दुसऱ्याचा मृतदेह नेला अंत्यसंस्कारासाठी!

नातेवाईकाच्या चुकीमुळे दुसऱ्याचा मृतदेह नेला अंत्यसंस्कारासाठी!

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान अनेक आश्चर्यचकीत करणाऱ्या घटना समोर येत आहेत. दरम्यान एका नातेवाईकांचा चुकीमुळे एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेल्याची घटना घडली आहे.

ही घटना हैदराबादमधील बेगमपेट येथील आहे. ८ जून रोजी ५७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मग मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयातील शवगृहात ठेवला होता. पण त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आला. परंतु अंत्यसंस्कार होण्यापूर्वी मृत व्यक्तीच्या पत्नीला हा मृतदेह आपल्या नवऱ्याचा नसल्याचे समजले. त्यानंतर मृतदेह पुन्हा रुग्णालयात नेण्यात आला.

दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह ओळखण्यासाठी मेहुणा रुग्णालयात गेला होता. पण त्याने त्यावेळेस दूर पाहिल्यामुळे मृतदेह ओळखण्यास चूक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती शवगृहात जाण्यास घाबरत होता आणि त्यामुळेच हे घडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात कुटुंबाच्या वतीने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

देशात आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा या सातत्याने वाढतानाच दिसत आहे.


हेही वाचा – कोरोना संदर्भात चीनच्या अध्यक्षांविरोधात बिहारमध्ये खटला दाखल; मोदी, ट्रम्प यांना बनवलं साक्षीदार!


 

First Published on: June 10, 2020 11:46 PM
Exit mobile version