Coronavirus: जगात २४ तासांत १.४२ लाखांहून अधिक नवे कोरोनाचे रुग्ण!

Coronavirus: जगात २४ तासांत १.४२ लाखांहून अधिक नवे कोरोनाचे रुग्ण!

Corona: जगात कोरोनाचा विळखा होतोय घट्ट, २४ तासांत २.१५ लाख नवीन रुग्ण

जगात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ८२ लाख पार झाली आहे. तर साडे चार लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत ८२ लाख ५७ हजार ५३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ४ लाख ४५ हजार ९८६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४३ लाख ६ हजार ७४८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात जवळपास ६२ टक्के कोरोनाच्या केसेस फक्त ८ देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ५१ लाखांहून अधिक आहे.

जगात कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त कहर अमेरिकामध्ये आहे. अमेरिकेत कोरोनाचे २२ लाखांहून अधिक रुग्ण आहेत. त्यापैकी १ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पण सध्या अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये कोरोनाचे जास्त रुग्णांची आणि मृतांची नोंद होत आहे. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित १० देश

अमेरिका : कोरोनाबाधित – २,२०८,४०० – मृत्यू – ११९,१३२
ब्राझील : कोरोनाबाधित – ९२८,८३४ – मृत्यू – ४५,४५६
रशिया : कोरोनाबाधित – ५४५,४५८ – मृत्यू – ७,२८४
भारत : कोरोनाबाधित – ३५४,१६१ – मृत्यू – ११,९२१
ब्रिटन : कोरोनाबाधित – २९८,१३६ – मृत्यू – ४१,९६९
स्पेन : कोरोनाबाधित – २९१,४०८ – मृत्यू – २७,१३६
इटली : कोरोनाबाधित- २३७,५०० – मृत्यू – ३४,४०५
पेरू : कोरोनाबाधित – २३७,१५६ – मृत्यू – ७,०५६
इराण : कोरोनाबाधित – १९२,४३९ – मृत्यू – ९,०६५
जर्मनी : कोरोनाबाधित – १८८,३८२ – मृत्यू – ८,९१०

या आठ देशांमध्ये दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण

अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन, इटली, भारत आणि पेरू या देशांमध्ये दोन लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. याशिवाय आठ देशांमध्ये एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. तर अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली या चार देशांमध्ये ३० हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – भारत-चीन तणाव: संयुक्त राष्ट्रसंघाकडून संयम पाळण्याचे आवाहन


 

First Published on: June 17, 2020 8:49 AM
Exit mobile version