Corona In India: एका दिवसात २ लाख ५९ हजारांहून अधिक नवे रुग्ण; १ लाखांहून अधिकांना डिस्चार्ज

Corona In India: एका दिवसात २ लाख ५९ हजारांहून अधिक नवे रुग्ण; १ लाखांहून अधिकांना डिस्चार्ज

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. देशात कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यापासून दिवसेंदिवस बाधितांच्या आकड्यात वाढ होताना दिसतेय. सोमवारी देशात २ लाख ७३ हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली तर गेल्या २४ तासात आज २ लाख ५६ हजारांहून अधिक नवे रूग्ण आढळ्याचे समोर आले आहे. या कालावधीत १ हजार ७६१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे १ लाख ५४ हजार ७६१ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोना बाधितांची संख्या चिंताजनक असून देशात कोरोना स्थिती अगदी गंभीर होत असल्याचे केंद्रीय आरोग्या विभागाच्या आकडेवारीनुसार समोर येत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत झालेली रुग्णवाढ आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली. दिवसभरात १ हजार ७६१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने ही संख्या एकूण १ लाख ८० हजार ५३० वर पोहोचली आहे तर आतापर्यंत देशात एकूण १ कोटी ५३ लाख २१ हजार ०८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या चिंताजनक वातावरणात दिलासादायक म्हणजे आतापर्यंत १ कोटी ३१ लाख ८हजारांहून अधिकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने कोरोनाच्या वाढणाऱ्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत देशात एकूण १२ कोटी ७१ लाख २९ हजारांहून अधिक नागरिकांनी कोरोनाची लस घेतली असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगितले जात आहे.

 

First Published on: April 20, 2021 10:04 AM
Exit mobile version