Corona record- जगभरात कोरोनाचे पुन्हा थैमान, एका दिवसात १५ लाख रुग्ण, तर ७००० जणांचा मृत्यू

जगभरात ओमीक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असतानाच कोरोनानेही पुन्हा एकदा अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये थैमान घातले आहे. कोरोना महामारी आल्यापासून जगात पहील्यांदाच एका दिवसात १६ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असून ७ हजार कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचपार्श्वभूमीवर जागतिक आऱोग्य संघटनेने (WHO) संपूर्ण जगाला सतर्क राहण्याच्या सूचना दिला असून डेल्टाच्या प्रकोपात ओमीक्रॉनचा वाढता संसर्ग कोरोनाची सुनामी आणतोय असा गंभीर इशारा दिला आहे.

WHO चे प्रमख ट्रेडोस गेब्रेयेसस (Tedros Ghebreyesus) यांनी गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत ११ टक्कयांनी वाढ झाल्याचे सांगितले आहे. २० ते २६ डिसेंबर या कालावधीमध्ये जगात ५० लाख कोरोना रु्ग्णांची नोंद करण्यात आली. यातील सर्वाधिक रुग्ण युरोपमध्ये आढळल्याचे सांगितले. तर worldometers.info ने दिलेल्या माहितीनुसार जगात काल कोरोनाचे १६. १३ लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ७,३९१ कोरोनामृत्यू झाले आहेत. जेव्हापासून कोरोना महामारी सुरू झाली तेव्हापासून पहील्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळले आहेत.

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि युरोपमध्येही कोरोनो रुग्णसंख्येने रेकॉर्डब्रेक केले आहेत.

अमेरिकेत बुधवारी २.६५ लाख कोरोना केसेसची नोंद झाली. याआधी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात २.५२ लाख कोरोना रुगांची नोंद झाली होती.

ब्रिटन-युकेने प्रसिद्ध केलेल्या डेटानुसार बुधवारी १.८३ पेक्षा जास्त कोरोनाच्या केसेसची नोंद करण्यात आली असून हा रेकॉर्ड आहे. तर ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे ब्रिटनमधील अनेक डॉक्टरांनी अद्याप बुस्टर डोस घेतलेला नाही.

फ्रान्स-फ्रान्समध्येही कोरोनाची सुनामी आली आहे. बुधवारी येथे २.०८ लाख कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. मंगळवारी य़ेथे १.८० लाख केसेसची नोंद झाली. युरोपात दर सेकंदाला दोन जण पॉझिटीव्ह येत असल्याने येथे कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

युरोप-ब्रिटन आणि फ्रान्सच नाही तर अनेक युरोपिय देशांमध्ये कोरोनाची रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या वाढत आहे. अर्जेंटीनामध्ये बुधवारी ४२, ०३२ नवीन कोरोना केसेसची नोंद झाली. इटलीमध्ये बुधवारी ९८,०३० नवीन कोरोना केसेस आल्या आहेत.

First Published on: December 30, 2021 5:17 PM
Exit mobile version