Corona Vaccine : Covaxin घेतल्यानंतर ‘या’ गोळ्या चुकूनही खाऊ नका; भारत बायोटेकने सांगितले कारण?

Corona Vaccine : Covaxin घेतल्यानंतर ‘या’ गोळ्या चुकूनही खाऊ नका; भारत बायोटेकने सांगितले कारण?

Children Vaccination:तुमच्या मुलांना कोवॅक्सिनचं दिली जातेय ना? भारत बायोटेकने केले अलर्ट

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. यात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला देखील ३ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. परंतु लस घेतल्यानंतर तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखीसारखी लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे बहुतांश जण लसीकरणानंतर पेन किलर, पॅरासिटामॉल गोळी औषध म्हणून घेत आहे. परंतु भारत बायोटेकने बुधवारी एक परिपत्रक काढून लस घेतल्यानंतर काय गोष्टी टाळाव्यात हे स्पष्ट केलं आहे. कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर मुलांनी पॅरासिटामॉल किंवा पेन किलर घेणं टाळा असं आवाहन या पत्रकातून करण्यात आले आहे.

भारत बायोटेकने पत्रकात म्हटले की, लसीकरण केंद्र मुलांसाठी कोवॅक्सिनसह 3 पॅरासिटामॉल 500 मिलिग्राम गोळी घेण्याची शिफारस करत आहे. परंतु लसीकरणानंतर मुलांना कोणतीही पॅरासिटामॉल किंवा पेन किलर घेण्याची शिफारस केली जात नाही.

या पत्रकात 30000 व्यक्तींच्या क्लिनिकल चाचण्यांचा हवाला देत सांगितले की, सुमारे 10-20 टक्के व्यक्तींना याचे साइड इफेक्ट्स जाणवले आहेत. तर अनेकांना सौम्य साइड इफेक्ट्स जाणवतात. पण ही लक्षणे साधारणत: 1-2 दिवसांत नाहीसे होतात. त्यांना औषधांची गरज नसते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची पेन किलर किंवा गोळी डॉक्टरांच्या सल्लानुसार घ्यावी असं कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने म्हटले की, कोणत्याही कोरोनाविरोधी लसींसोबत पॅरासिटामॉलची शिफारस करण्यात आली असेल तरी कोवॅक्सिनसाठी औषधांची आवश्यकता नाही. दरम्यान देशात ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग पाहता ३ जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. या मुलांना कोवॅक्सिनचा पहिला डोस दिला जात आहे. आतापर्यंत देशात 1.06 कोटीहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस दिला आहे.


Corona Virus : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह, नाशिकच्या दोन्ही खासदारांना कोरोना


First Published on: January 6, 2022 10:17 AM
Exit mobile version