घरताज्या घडामोडीCorona Virus : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह, नाशिकच्या दोन्ही...

Corona Virus : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह, नाशिकच्या दोन्ही खासदारांना कोरोना

Subscribe

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गोडसे केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासोबत बैठकांना उपस्थित राहिले होते. मुंबई आणि नाशिकच्या दौऱ्यातही हेमंत गोडसे केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासोबत होते.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. भारती पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आणि मुंबईत बैठका घेतल्या होत्या. तसेच भारती पवार यांनी १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ केला होता. यावेळी भारती पवार अनेकांच्या संपर्कात आल्या होत्या. दरम्यान नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. भारती पवार यांनी त्रास होत असल्यामुळे कोरोना चाचणी केली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

भाजप खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी आणि काळजी घ्यावी. कोरोना नियमांचे पालन करुन स्वतःचे संरक्षण करावे असे आवाहन भारती पवार यांनी केले आहे.

- Advertisement -

खासदार हेमंत गोडसेंना कोरोनाची लागण

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गोडसे केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासोबत बैठकांना उपस्थित राहिले होते. मुंबई आणि नाशिकच्या दौऱ्यातही हेमंत गोडसे केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासोबत होते. कार्यक्रम आणि दौऱ्यानंतर गोडसेंचा कोरोना अहवाल पहिला पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर आज डॉ. भारती पवार यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात ७० आमदारांना कोरोना

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामध्ये नेत्यांचीही सर्वाधिक संख्या आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण १३ मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वाधिक नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे.


हेही वाचा : राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -