भारतात लहान मुलांसाठी कोरोना लस सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता – NIV संचालक

भारतात लहान मुलांसाठी कोरोना लस सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता – NIV संचालक

भारतात लहान मुलांसाठी कोरोना लस सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता - NIV संचालक

भारतात लहान मुलांच्या लसीकरणासाठी अनेक स्तरातून मागणी करण्यात येत आहे. लहान मुलांच्या लशींची क्लिनिकल ट्रायल सुरू असून भारतात लहान मुलांना सप्टेंबरपर्यंत कोरोना लस मिळण्याची शक्यता असल्याची माहिती ICMR NIV च्या संचालिका प्रिया अब्राहम यांनी दिली आहे. (Corona vaccine for children in India likely to arrive in September – NIV Director) सध्या सर्वत्र होणारी गर्दी पाहता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आंमत्रण देत असल्याचे प्रिया अब्राहम यांनी म्हटले आहे. कोव्हॅसिन (Covaxin) लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतील २ ते १८ वयोगटातील मुलांच्या लशींचे ट्रायल पूर्ण होऊन त्यातून चांगले रिझल्ट समोर येणार आहेत. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भारतात लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

कोव्हॅक्सिन (Covaxin) सोबतच झायडस कॅडिला (Zydus Cadila) लसीच्या चाचण्या देखील सुरू आहेत त्या लसीची ट्रायल देखील वेगवाग गतीने सुरू असून झायडस कॅडिलाची लस देखील सप्टेंबर महिन्यात लहान मुलांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरमध्ये Covaxin तर ऑक्टोबरमध्ये Covovax

NIAच्या संचालिका प्रिया अब्राहम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, कोव्हॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण होत आहे. त्याचे रिझल्ट आल्यानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ती लस लहान मुलांसाठी उपलब्ध होऊ शकते. त्याचप्रमाणे सीरम इन्स्टीट्यूटचे सीईओ अदर पुनावाला (Adar Poonavala) यांनी देखील त्यांची Covovax लस ही ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात लाँच केली जाऊ शकते असे म्हटले आहे. दोन डोसच्या स्वरुपात असलेल्या या लसीची किंमत लाँचिंगच्या वेळीच सांगण्यात येईल असे पूनावाला यांनी म्हटले आहे.

कोरोनाची तिसरी लहान मुलांसाठी धोकादायक

दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देखील भारतात लहान मुलांसाठीची लस सप्टेंबर पर्यंत लाँच करण्यात येईल असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे २०२१च्या शेवटापर्यंत देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोना व्हायरस अद्याप संपूर्णपणे नष्ट झालेला नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होत आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे अनेक रिपोर्टमधून समोर आले आहे. त्यामुळे देशातील लहान मुलांचे लसीकरण वेगाने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – Covid-19 चाचणी होणार RT-PCR पेक्षा वेगवान, NIH च्या वैज्ञानिकांचे संशोधन

First Published on: August 18, 2021 9:15 PM
Exit mobile version