कोरोना व्हायरसचा उगम चीनी लॅबमधूनच, चीनी संशोधकांच्या हवाल्याने अमेरिकेचा दावा!

कोरोना व्हायरसचा उगम चीनी लॅबमधूनच, चीनी संशोधकांच्या हवाल्याने अमेरिकेचा दावा!

जगभरात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) फैलाव सुरू असताना त्याच्यावर उपयुक्त ठरू शकेल, अशा व्हॅक्सिनवर जगातल्या अनेक संशोधन संस्था संशोधन करत आहेत. मात्र, त्याबरोबरीनेच हा व्हायरस नक्की कसा आणि कुठून आला आहे यावर देखील संशोधन सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे मुख्य रणनीतीकार अर्थात चीफ स्ट्रॅटेजिस्ट स्टीव्ह बॅनन यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. चीनमधून पळून आलेले काही संशोधक आणि वैज्ञानिक अमेरिकन संशोधकांच्या संपर्कात आले असून त्यांच्यासोबत हा व्हायरस चीनच्या प्रयोगशाळांमधून कसा उगम पावला, यावर संशोधन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, याआधी हाँगकाँगने देखील चीनी प्रयोगशाळांवर असाच आरोप केला होता.

वुहानमधले संशोधक अमेरिकेसोबत!

बेनन यांनी द मेलला मुलाखतीत सांगितल्यानुसार, ‘वुहानमधल्या लॅब्जच्या (Wuhan Labs) संशोधकांना हाताशी धरून अमेरिकेतील संशोधक यावर संशोधन करत आहेत. यातून चीनवर कायदेशीर कारवाई कशा पद्धतीने करता येईल, हे देखील समोर येऊ शकेल. चीनच्या लॅब्जमध्ये काही जीवघेण्या व्हायरसवर संशोधन सुरू होते. त्यातूनच हा व्हायरस बाहेर आला असावा आणि त्याचा फैलाव झाला असावा’, असा दावा बेनन यांनी केला आहे. दरम्यान, चीनविरोधात जगभरातल्या देशांनी एकत्र येऊन या हुकुमशाही वृत्तीला पराभूत करायला हवं, असं आवाहन देखील यावेळी बेनन यांनी केलं आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमध्ये सापडल्यानंतर चीनने त्याची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेवर देखील चीनला फेव्हर केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नक्की हा व्हायरस कुठून आला या प्रश्नाचं उत्तर मिळणं महत्त्वाचं ठरत आहे.

First Published on: July 14, 2020 2:52 PM
Exit mobile version