खुशखबर: ‘या’ दिवशी संपणार कोरोनाचे संकट; ज्योतिषाने दिले शुभसंकेत

खुशखबर: ‘या’ दिवशी संपणार कोरोनाचे संकट; ज्योतिषाने दिले शुभसंकेत

'या' दिवशी संपणार कोरोनाचे संकट

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणुचा ७ लाख ३५ हजार ३३६ लोकांना संसर्ग झाला आहे. तर ३४ हजार ८१८ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख ५६ हजार १३७ जण बरे झाले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहे. कोरोनामुळे अनेक देशात लॉकडाऊन केले आहे. मात्र, अद्याप कोरोनावर उपचार न आल्याने हा रोग कधी संपणार या विवंचनेत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जगातील सर्वात लहान १४ वर्षीय अभिग्य आनंद या ज्योतिषाने एक अंदाज वर्तवला होता. नोव्हेंबर २०१९ ते एप्रिल २०२० हा काळ जगासाठी अत्यंत कठीण असणार आहे, असे भाकीत या ज्योतिषाने केले होते. ३१ मार्चपर्यंत जगासाठी हे संकट सर्वात मोठं असेल, असा ईशारा त्य़ाने दिला होता. परंतू हे संकट केव्हा टळेल हे देखील त्याने सांगितले होते.


हेही वाचा – धक्कादायक: कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना डॉक्टरांनाच कोरोनाची लागण


३१ मार्चपासून कोरोनाचा कठीण काळ सुरु झाला आहे. जगावर आलेले हे संकट २९ मे रोजी दूर होईल. जागतिक महामारीचा प्रादुर्भाव या तारखेला कमी होईल, असे म्हटले होते.  कारण मंगळ, शनी, चंद्र आणि राहू एकत्रित होतील. त्यामुळे यामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल. ही एक दुर्मिळ घटना आहे, असे अभिग्य आनंद या ज्योतिषाने म्हटले आहे. अभिग्य आनंदची २०१३ मध्ये इंडियन टाइम्सने मुलाखत घेतली होती. त्यात त्याच्या ज्योतिष कौशल्याची चाचणी घेण्यात आली.

 

First Published on: March 30, 2020 5:29 PM
Exit mobile version