Coronavirus: भारतात तरुणांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका

Coronavirus: भारतात तरुणांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका

भारतात तरुणांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका

भारतात कोरोना विषाणूने तरुणांना आपल्या विळख्यात घेतल्याचं एका अहवालात समोर आलं आहे. भारतात आतापर्यंत ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ६० टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आकडेवारीनुसार १ हजार ८०१ रुग्णांपैका ३९१ म्हणजेच २२ टक्के रुग्ण ३० ते ३९ वर्षे वयोगटातील आहेत. यानंतर, ३७६ म्हणजे २१ टक्के २० ते २९ वर्षांच्या दरम्यान आहेत. तर १७ टक्के संक्रमित लोक हे ४० ते ४९ वर्षांचे आहेत. यापूर्वी चीन आणि इटलीसारख्या इतर देशांकडून येणाऱ्या अहवालात कोरोना विषाणूमुळे बळी पडलेल्या वृद्धांची संख्या सर्वाधिक असल्याचे म्हटलं होतं. परंतु भारतात कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे रुग्ण केवळ १७ टक्के आणि ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांपैकी केवळ २ टक्के रुग्ण कोरोना विषाणूमुळे बाधित आहेत. १ एप्रिल पर्यंत ३ टक्के म्हणजेच ४६ प्रकरणे नोंदली गेली ज्यात संक्रमित रूग्णाचे वय 10 वर्षांपेक्षा कमी आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की आतापर्यंत तरुण लोक असा विचार करीत होते की त्यांना या आजाराचा कमी परिणाम होईल. परंतु ते गंभीर आजारी पडू शकतात आणि मृत्यूही होऊ शकतो.


हेही वाचा – लॉकडाऊचं उल्लंघन करणाऱ्या वडिलांविरोधात मुलाने केली पोलिसांत तक्रार


न्यूयॉर्कमधील ट्रूडो इन्स्टिट्यूटमध्ये इन्फ्लूएंझा व्हायरस तज्ञ आणि मुख्य अन्वेषक डॉ. प्रिया लूथ्रा यांनी एका वृत्त संस्थेला सांगितलं की, “भारतात आपण पाहू शकतो की, किती अचानक घटना घडल्या आहेत. जागतिक पातळीवर, ५० वर्षांवरील वयोवृद्ध लोकांना या आजाराचा सर्वात जास्त धोका आहे. पण हे संक्रमण कोणालाही होऊ शकते. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संसर्ग एखाद्या व्यक्तीमध्ये अगदी सौम्य असू शकतो, जिथे संसर्गाची कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे नसतात. परंतु त्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते आणि त्या व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं. म्हणून प्रत्येकाने सामाजिक अंतर राखलं पाहिजे आणि हात स्वच्छ ठेवण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.”

 

First Published on: April 3, 2020 4:32 PM
Exit mobile version