भयंकर! कोरोना मृतांमुळे छत्तीसगडमधील सरकारी रुग्णालयाला आले स्मशानाचे रुप

भयंकर! कोरोना मृतांमुळे छत्तीसगडमधील सरकारी रुग्णालयाला आले स्मशानाचे रुप

भयंकर! कोरोना मृतांमुळे छत्तीसगडमधील सरकारी रुग्णालयाला आले स्मशानाचे रुप

देशात कोरोनाचे गंभीर वास्तव समोर आहे. कोरोना रुग्णसंख्या जस जशी वाढतेय तसा रुग्णालय प्रशासनावरील ताण अधिक वाढतोय. यातच छत्तीसगडमधील कोरोनाची महाभयंकर स्थिती समोर येत आहे. छत्तीसगडमधील एका सरकारी रुग्णालयात शवगृह हे कोरोना रुग्णांच्या मृतदेहांनी भरून गेले असून शव ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने शवगृहाबाहेरील फर्शीवर मृतांचा खच पडून आहे. एवढेच नाही तर रुग्णालयातील स्ट्रेचरवरही मृतदेहांचे ठीग ठेवण्यात आले आहेत. ही दृश्ये तुम्हालाही विचलीत करु शकतात. छत्तीसगडमधील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस जीवघेणा ठरत असून मृत्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी एवढ्या मोठ्याप्रमाणात महाभयंकर, जीवघेणी ठरेल कसा विचारही कोणी केला नसेल. रायपूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाचे कोरोना मृतांमुळे स्मशानभूमीत रुपांतर झाले आहे. या रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने शवगृहात मृतदेह ठेवण्यासही जागा शिल्लक नाही.

छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील आत्ताच्या घडीला कोरोनाची ही स्थिती आहे. रायपूर जिल्ह्यातील सरकारी डॉ. भीमराव आंबेडकर मेमोरियल रुग्णालयात मृतदेह हे जमिनीपासून ते अगदी स्ट्रेचरवर पडून आहेत. तसेच शवगृहातील मर्चुरी फ्रिजरही फुल्ल झाले आहेत. रविवारी रायपुरमध्ये १०, ५२१ नव्या कोरोना रुग्ण समोर आले आहे.

रायपुर जिल्ह्यातील मुख्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी मीरा बघेल यांनी सांगितले की, कधी वाटलेही नव्हते एका वेळेस एवढ्यामोठ्य़ा प्रमाणात मृत्यू होते. या रुग्णालयात सामान्य मृतांचे मृतदेह ठेवण्यासाठी मर्यादित फ्रिज आहेत. मात्र मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने फ्रिज कमी पडू लागलेत. दरम्यान रायपूरमध्ये दर दिवशी ५५ कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे छत्तीसगडमधील कोरोना स्थिती दिवसेंदिवस महाभयंकर रुप घेत आहे.


 

First Published on: April 13, 2021 2:20 PM
Exit mobile version