Coronavirus : देशभरात चोवीस तासांत ३ हजार ३२० नवे रुग्ण, ९५ जणांचा मृत्यू

Coronavirus : देशभरात चोवीस तासांत ३ हजार ३२० नवे रुग्ण, ९५ जणांचा मृत्यू

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात रोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ३ हजार ३२० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५९ हजार ६६२ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये ३९ हजार ८३४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर १७ हजार ८४७ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आतापर्यंत १ हजार ९८१ जणांचा मृत्यू झालेला आहे.


हेही वाचा – पालिका आयुक्त परदेशींची तडकाफडकी बदली


भारतात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू, पर्यटक आदींना गावी पोहोचवण्यासाठी बस आणि रेल्वे सेवा सुरु करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत रेल्वे मंत्रालयाने २२२ विशेष गाड्या सोडल्या आहेत. तब्बल अडीच लाखांहून अधिक लोकांच्या प्रवासाची व्यवस्था केली आहे, अशी महिती केंद्रीय गृह संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी शुक्रवारी दिली.

 

First Published on: May 9, 2020 10:31 AM
Exit mobile version