दिलासादायक! देशात ७३ हजाराहून अधिक रूग्णांनी केली कोरोनावर मात

दिलासादायक! देशात ७३ हजाराहून अधिक रूग्णांनी केली कोरोनावर मात

Corona: देशात कोरोनाचा उद्रेक! आजची आकडेवारी धडकी भरवणारी

देशात गेल्या २४ तासांत ५४ हजार ३६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांचा आकडा ७७ लाख ६१ हजार ३१२ इतका झाला आहे. तर देशात सध्या ६ लाख ९५ हजार ५०९ अॅक्टिव्ह केसेस असून त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे. दरम्यान गुरूवारी या कोरोना रूग्ण संख्येत २० हजार ३०३ रुग्णांची घट झाली आहे. तर आतापर्यंत १ लाख १७ हजार ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे ६९ लाख ४८ हजार ४९७ जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली असून गेल्या २४ तासांत त्यापैकी ७३ हजार ९७९ जणांना गुरूवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाचा कहर देशात नियंत्रणात आला असला तरी कोरोनाच्या चाचण्या सुरूच आहेत. देशात २२ ऑक्टोबरपर्यंत १० कोटी १ लाख १३ हजार ०८५ जणांचे नमुने कोरोना चाचणी करता घेण्यात आले. तर गेल्या २४ तासात १४ लाख ४२ हजारांहून अधिक जणांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती ICMR ने दिली.


Corona: ‘कोव्हॅक्सीन’ची हजारो स्वयंसेवकांवर होणार चाचणी; तिसऱ्या फेजसाठी भारत बायोटेकला परवानगी

First Published on: October 23, 2020 10:17 AM
Exit mobile version