घरदेश-विदेशCorona: ‘कोव्हॅक्सीन’ची हजारो स्वयंसेवकांवर होणार चाचणी; तिसऱ्या फेजसाठी भारत बायोटेकला परवानगी

Corona: ‘कोव्हॅक्सीन’ची हजारो स्वयंसेवकांवर होणार चाचणी; तिसऱ्या फेजसाठी भारत बायोटेकला परवानगी

Subscribe

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने गुरुवारी भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडकडून ‘कोव्हॅक्सीन’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी करायला परवानगी

जगभरात कोरोनाच्या एकूण ६० लशींची वेगवेगळ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे. यादरम्यान एक दिलासा देणारी बातमी येत आहे. दरम्यान ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने गुरुवारी भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडला ‘कोव्हॅक्सीन’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी करायला परवानगी दिली आहे.  तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी भारत बायोटेकला मान्यता मिळाली आहे. या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ही देशभरातील १८ ते १९ वेगवेगळ्या ठिकाणी केली जाणार असल्याची माहिती मिळतेय.

‘कोव्हॅक्सीन’ ही स्वदेशी लस आहे. काही किरकोळ बदल करुन, डीजीसीआयने लशीच्या तिसऱ्या फेजच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. कंपनीने फेज एक आणि फेज दोन चाचणीचा डाटा तसेच प्राण्यांवरील चाचणीचा डाटा डीजीसीआयच्या तज्ज्ञांच्या समितीसमोर सादर केला. लशीची परिणामकारकतेचे मूल्यमापन करण्यासाठी तिसऱ्या फेजच्या चाचणीची परवानगी देण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर केला.

- Advertisement -

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार,काही बदल सुचवून समितीने भारत बायोटेकला तिसऱ्या फेजची चाचणीसाठी परवागनी दिली. आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआयव्ही) बीबीआयएलने मिळून कोव्हॅक्सीन लस विकसित केली आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून भारत बायोटेकद्वारे स्वदेशी लशीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू होणार आहेत. सध्या या लशीची देशात दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी नोव्हेंबरपासून करण्यात येईल असा अंदाज आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत.


Covid-19: ब्राझीलमध्ये ऑक्सफोर्ड लस चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू; तरीही चाचणी सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -