CoronaVrius: कधी सुधारणार? कोरोनाच्या हेल्पलाईनवर मागतायत पान-गुटखा!

CoronaVrius: कधी सुधारणार? कोरोनाच्या हेल्पलाईनवर मागतायत पान-गुटखा!

कोरोना विषाणू रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला. या लॉकडाऊन दरम्यान लोकांना मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला. मात्र या हेल्पलाईन क्रमांकावर उत्तर प्रदेशमधील लोक फाजलीपणा करू कोणत्याही गोष्टींसाठी फोन करून मागणी करत असल्याचं समोर आलं आहे. लोकांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर काही लोक रसगुल्ला, समोसा, पान, मसाला आणि गुटख्याची मागणी करीत आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लोकांना औषध आणि रेशन देण्यासाठी १०७६ हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला.

लखनऊच्या उच्च रक्तदाब असलेल्या राम रतन पाल यांनी हेल्पलाईन क्रमांकावर कॉलकरून औषध संपल्याचं सांगितलं. त्यावेळी त्वरित अधिकाऱ्यांनी त्यांच्या औषधांची व्यवस्था केली. त्यानंतर गौतम बुध नगरमधील शंकरसिंग नावाच्या व्यक्तीने हेल्पलाईनवर खाद्यपदार्थासाठी मदत मागितली. त्यावेळेस त्याच्या घरी लगेच रेशन पोहोचवले, असं अधिकाऱ्याने सांगितलं.

उत्तर प्रदेशातील राज्य पोलीस हेल्पलाईन नंबरवर एक वृद्ध व्यक्तीने फोन करून रसगुल्ला पाहिजे असल्याचं सांगितलं. पहिल्यांदा पोलिसांना कोणती तरी टाईमपास करत असल्याचं वाटलं. मात्र जेव्हा राजधानीच्या हजरतगंज भागातील एक पोलीस वृद्धाला रसगुल्ला देण्यासाठी पोहोचला तेव्हा त्याला ८० वर्षांच्या वृद्धाला खरोखरच रसगुल्लाची गरज असल्याचं समजलं. त्या वृद्धाला मधुमेहाचा त्रास होता आणि त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाली होती त्यामुळे त्यांना रसगुल्लाची खूप गरज होती.

मात्र काहीजण उगाच पोलिसांच्या हेल्पलाईन ११२वर फोन करून पान, गुटखा, समोसा मागत असल्याचं निर्देशनास आलं. म्हणून पोलिसांनी ज्याने समोसा मागितला होता त्याला समोसा दिला. मात्र त्यानंतर त्याला पोलिसांनी ठाण्यात बोलवून जवळील नाले साफ करण्यास सांगितलं. अशा प्रकारे उगाच दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांना उत्तर प्रदेशमध्ये लोक त्रास देत असल्याचं येत आहे.


हेही वाचा – LockDown: लग्नासाठी मंदिरात पोहोचले वधु-वर; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!


 

First Published on: April 18, 2020 6:53 PM
Exit mobile version