घरदेश-विदेशLockDown: लग्नासाठी मंदिरात पोहोचले वधु-वर; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!

LockDown: लग्नासाठी मंदिरात पोहोचले वधु-वर; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!

Subscribe

गुजरातमधील नवसारी येथील चिखली भागात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी १४ जणांवर कायदेशीर कारवाई

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता, लोकांनी घरीच रहा आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र तरी देखील काही लोक या जीवघेण्या व्हायरसला गंभीरपणे घेतांना दिसत नाहीत. देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या १४ हजारांच्या वर गेली आहे. अशा परिस्थितीत गुजरातमधील नवसारी येथील चिखली भागात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी १४ जणांवर कायदेशीर कारवाई केली आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी वर, वधू आणि त्यांच्या नातेवाईकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नवसारीतील वनकल गावात एका मंदिरावर छापा टाकला आणि तेथे १४ लोक एकत्रित लग्नासाठी येथे जमले होते. पोलिसांनी त्यावर कायदेशीर कारवाई केली आहे, असे नवसारीचे पोलिस अधिक्षकांनी सांगितले. आतापर्यंत गुजरातमध्ये कोरोना व्हायरसचे हजाराहून अधिक प्रकरणं नोंदवली गेली असून ३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र ७४ लोकं पुर्णपणे बरे झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरस संक्रमणाची संख्या वाढून १४ हजार ३७८ झाली आहे. तसेच गेल्या २४ तासात कोरोनाची ९९१ नवीन रूग्णांची नोंद झाली आहे आणि ४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात ४८० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यावर मात करून १ हजार ९९२ रूग्ण यशस्वी झाले आहेत.


Corona: कराचीमध्ये ४९ दिवसांत ३ हजार २६५ मृतदेह केले दफन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -