LockDown: ऑफिस सुरू होताच कर्मचाऱ्यांमध्ये रंगली किसिंग कॉन्टेस्ट!

LockDown: ऑफिस सुरू होताच कर्मचाऱ्यांमध्ये रंगली किसिंग कॉन्टेस्ट!

LockDwon: ऑफिसं सुरू, कर्मचारी हजर, कर्मचाऱ्यांमध्ये रंगली 'किसिंग कॉन्टेस्ट'

कोरोना व्हायरसचा कहर चीनच्या वुहान शहरातून सुरू झाला, संपूर्ण जगामध्ये हा कहर सुरू असतानाच चीनमधील परिस्थिती आधीपेक्षा सुरळीत होताना दिसत आहे. यामुळे चीन सरकारने लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणत काही जीवनावश्यक कामं सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, लॉकडाऊननंतर बऱ्याच दिवसांनंतर कंपनी, ऑफिसेस पुन्हा सुरू झाल्याने एका कंपनीतील कर्मचाऱ्यांनी वेगळ्याच स्टाईलने जल्लोष केला आहे. यावेळी कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये किसिंग कॉन्टेस्ट (Kissing Contest) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान कर्मचाऱ्यांनी एकमेकांना किस केल्याचे फोटोंमध्ये दिसून येत आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ही स्पर्धा कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केली होती. या स्पर्धेच्या फोटोंसह त्याच्या व्हिडीओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. चीनमधील सोशल मीडियावर या फोटोंना १ कोटींहून अधिक लोकांनी बघितले असून त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करा, असे सरकारचे आवाहन असताना देखील चीनमधील कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी होत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसले, यामुळे अनेक नेटकऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांवर टीका देखील केली आहे.

सुझौ शहरातील ‘युएया’ नावाच्या फर्निचर कंपनीमध्ये १० कर्मचारी जोडप्यांना या किसिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमंत्रित केले होते. या फोटो आणि व्हिडीओमध्ये असे दिसून येते की हे जोडपे एकमेकांना किस करत आहेत. यातील बहुतेक लोक विवाहित असून किस घेत असताना जोडप्याच्या मधोमध एक पारदर्शक काच लावण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धक जोडप्यांनी फॅक्टरीचे कपडे घातले होते.

ग्लोबल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, ही स्पर्धा फॅक्टरी पुन्हा एकदा सुरू झाल्याच्या आनंदात ठेवण्यात आली होती. सहभागी झालेल्यांपैकी काही जण फॅक्टरीत काम करणारे विवाहित जोडपे होते. या साथीच्या आजारामुळे बर्‍याच लोकांना प्रचंड तणावाचा सामना करावा लागला आणि त्यांना आनंद देण्यासाठी ‘किसिंग कॉन्टेस्ट’ आयोजित केल्याचे कंपनीच्या मालकाने सांगितले.


Photo : ‘असा’ शूट झाला ‘महाभारता’तील द्रोपदी वस्त्र हरणाचा सीन
First Published on: April 22, 2020 11:02 AM
Exit mobile version