घरट्रेंडिंगPhoto : 'असा' शूट झाला 'महाभारता'तील द्रोपदी वस्त्र हरणाचा सीन

Photo : ‘असा’ शूट झाला ‘महाभारता’तील द्रोपदी वस्त्र हरणाचा सीन

Subscribe

या सीनसाठी २५० मीटरची स्पेशल साडी ऑर्डर देऊन तयार करण्यात आली होती. रूपा गांगुली यांनी चित्रीकरणादरम्यान, फक्त ६ मीटरची साडी नेसली होती.

लॉकडाऊनमध्ये दूरदर्शनवर रामायण, महाभारत या ९०च्या दशकातील गाजलेल्या मालिकांचे पुन:प्रसारण दाखवण्यात येत आहे. या मालिकांना प्रेक्षकांनी पुन्हा एकदा भरभरून प्रतिसाद दिला आहे. या मालिकांमुळे अनेक वर्षांनंतर दुरदर्शन ही वाहिनी नंबर १ वर आली आहे. या मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या दृश्यांवर आजही प्रेक्षक गुंतून जातात. नुकताच महाभरातातील महत्त्वाचा मानला जाणारा द्रोपदी वस्त्रहरणाचा भाग दाखविण्यात आला. पण तुम्हाला माहिती आहे का की हा द्रोपद्री वस्त्र हरणाचा सीन कसा शूट करण्यात आला.

- Advertisement -

बी.आर.चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत नुकतंच द्रोपदीचं चीर हरण दाखवण्यात आलं. वस्त्र हरण दरम्यान द्रोपदी मदतीसाठी कृष्णाला बोलावते आणि रडायला लागते. पण आहे सीन चित्रीत करत असताना द्रोपदीची भुमिका करणाऱ्या अभिनेत्री रुपाली गांगुली या खऱ्याखुऱ्या रडायला लागल्या होत्या. त्यामुळे शुटींग थांबवावे लागले होते. अर्ध्या तासानंतर पुन्हा शुटींगला सुरूवात झाली. खरतर शूट सुरू करण्यापूर्वी रूपा गांगुली यांना पूर्ण सीन समजावण्यात आला होता. पण शूट सुरू झाल्यानंतर संवाद बोलताना अचानक त्या रडायला लागल्या.

- Advertisement -

या मालिकेचे दिग्दर्शक बी.आर.चोप्रा यांनी महाभारतातील या सीनवर खूप मेहनत घेतली. त्यामुळे ते ही घटना खरी वाटेल अशी दाखवणार होते. त्यामुळे त्यांनी रूपा गागुली यांन सांगितले होते की, भर दरबारात जर एखाद्या महिलेला केस पकडून खेचून आणले आणि तीचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला तर तीची काय अवस्था असेल हे त्यांनी समजावून सांगितले.

या सीनसाठी २५० मीटरची स्पेशल साडी ऑर्डर देऊन तयार करण्यात आली होती. रूपा गांगुली यांनी चित्रीकरणादरम्यान, फक्त ६ मीटरची साडी नेसली होती. मात्र, ‘महाभारत’ मध्ये चीर हरणवेळी जी साडी नेसलेली दाखवण्यात आली, तिला स्पेशल इफेक्टच्या मदतीने तयार करण्यात आलं होतं. यासाठी एका फ्रेममध्ये स्पेशल इफेक्टने तयार केलेली साडी शूट करण्यात आली आणि दुसऱ्या फ्रेममध्ये द्रोपदी होती. या स्पेशल इफेक्टमुळे हा सीन खारखूरा वाटला होता.


हे ही वाचा – Video – ‘या’ क्रिकेटपटूने तयार केलं एम. एस.धोनीवर गाणं, सोशल मीडियावर व्हायरल!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -