CoronaVirus: कोरानापासून पूर्णपणे बरे झाल्यानंतरही आरोग्याच्या या समस्या…

CoronaVirus: कोरानापासून पूर्णपणे बरे झाल्यानंतरही आरोग्याच्या या समस्या…

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना विषाणू रोखण्याकरिता लसीसाठी विज्ञान जगात वेगाने संशोधन केले जात आहे. दरम्यान कोरोना विषाणू विषयी चीनच्या शास्त्रज्ञांनी नुकताच दिलेला इशाऱ्यामुळे लोकांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. चीनच्या डॉक्टरांनी असा दावा केला आहे की, कोरोना रिकव्हर झालेला रुग्णाला बऱ्याच काळ कोणत्या कोणत्या आरोग्याच्या समस्येशी संघर्ष करावा लागेल.  यासंदर्भात नॅशनल हेल्थ कमिशनने देखील रिकव्हर झालेल्या रुग्णांविषयी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. जेणेकरून डॉक्टर कोरोना मात केलेल्या रुग्णांच्या शरीरावर नियमित नजर ठेवू शकतील.

अहवालात असा दावा केला आहे की, कोरोनातून रिकव्हर झालेल्या रुग्णांमध्ये अद्यापही काही जणांवर फुफ्फुस, हृदयाची समस्या, स्नायूंचा त्रास, आणि मनोविकार यासारख्या आजारांवर उपाचार करणे आवश्यक आहे. सरकारी आकडेवारीनुसार, चीनमध्ये आतापर्यंत ७८ हजारहून अधिक रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

डॉक्टर म्हणतात की, कोरोनामुळे गंभीर असलेल्या लोकांना पुढेही बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोरोनामुक्त झाल्यानंतर आपण बऱ्याच दिवसांपर्यंत हार्ट समस्याचे शिकार होऊ शकता. कोरोनातून रिकव्हर होणाऱ्या रुग्णांमध्ये डिप्रेशन, निद्रानाश, खाण्याचे प्रोब्लेम आणि सर्व प्रकाराच्या मानसिक आणि न्युरोलॉजिकल समस्या दिसत आहेत.

मेडिकल जर्नल किडनी इंटरनॅशनलने प्रकाशित केलेल्या अभ्यासनुसार, नॉर्थवेल हेल्थ मेडिकल फॅसिलिटी न्यूयॉर्कने ५ हजार ४४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर एक चाचणी केली. या दरम्यान तीन लोकांपैकी एकामध्ये मूत्रपिंडाचा गंभीर त्रास दिसून आला आहे.

नॉर्थवेल येथील संशोधन नेफ्रोलॉजीचे असोसिएट चीफ कॅनार झावेरी म्हणाले की, १४.३ टक्के लोकांना डायलिसिसवर ठेवण्याची गरज आहे. तर लहान मुलांना कावासाकी रोगाची लक्षणे दिसत आहेत. या कावासाकी रोगाची लक्षणे ताप येणे, लाल डोळे होणे, शरिरावर चट्टे आणि घसा सुजणे आहे.


हेही वाचा – CoronaVirus: भारताने कोरोनाबाधितांच्या आकड्यात चीनसह ‘या’ देशाला टाकले मागे!


 

First Published on: May 16, 2020 5:19 PM
Exit mobile version