Video – …आणि कोरोना पॉझिटिव्ह पोलिसांनी हॉस्पिटलमध्येच सुरू केला व्यायाम!

Video – …आणि कोरोना पॉझिटिव्ह पोलिसांनी हॉस्पिटलमध्येच सुरू केला व्यायाम!

जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. सध्या सगळ्यांनीच या कोरोना व्हायरसचा धस्का घेतला आहे. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हीडिओमुळे तुम्हालाही एक नवी उमेद मिळेल. दिल्लीमधील पोलिसांचा हा व्हीडिओ आहे. दिल्लीत पोलिस कोरोना पॉझिटिव्ह असूनही ते उमेद हरलेले नाही. त्यांच्या मनात अजिबात भिती नाहीये. दिल्लीतील चांदनीमहलमधील ८ पोलिसांनी कोरोनाची लागण झाली आहे.

हे पोलिस सकाळी उठल्यावर आपल्या हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये आरोग्य चांगलं रहावं यासाठी योगा आणि व्यायाम करतात. त्यांच्या या फोटोंमुळे आज अनेक कोरोना रूग्णांचा मनोधैर्य वाढण्यास मदत होईल. दिल्लीमध्ये ड्यूटीवर असताना कोरोना रूग्णाच्या संपर्कात आल्यामुळे या पलिसांना कोरोनाची लागण झाली. आता दिल्लीत २९ पलिस कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

जहांगीरपुरी परिसरातील एका भागात तब्बल ४६ जणं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्याचवेळी शहादरा भागात एका ठिकाणी ७ जण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. गेल्या २४ तासांत दिल्लीत कोरोनाचे १२८ नवे रुग्ण आढळले असून आणि २ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता हॉटस्पॉट झोनची संख्याही वाढवण्यात आली आहे. या ठिकाणी ९२ हॉटस्पॉट्स तयार झाले आहेत. दिल्लीत सध्या कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या २ हजार ३७६ झाली असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण ८०४ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत.


हे ही वाचा – सरकारच्या वाढीव महागाई भत्ता रोखण्याच्या निर्णयाला विरोध, पुनर्विचार करण्याची मागणी!


 

First Published on: April 24, 2020 11:44 AM
Exit mobile version