धक्कादायक! टिकटॉक व्हिडीओवरील कोरोनाचा घरगुती उपाय पडला महाग!

धक्कादायक! टिकटॉक व्हिडीओवरील कोरोनाचा घरगुती उपाय पडला महाग!

धक्कादायक! टिकटॉक व्हिडीओवरील कोरोनाचा घरगुती उपाय पडला महाग!

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरसपासून वाचवण्याकरिता अनेक घरगुती उपाय केले जात आहे. मात्र हे उपाय करताना सावधगिरी बाळगा. दरम्यान कोरोना व्हायरसपासून वाचण्याकरिता घरगुती उपाय टिकटॉकवर एका व्हिडीओत सांगितला होता. मात्र हाच घरगुती उपाय महागात पडला आहे. या घरगुती उपायामुळे १० जण थेट रुग्णालयात पोहोचले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवा तुम्हाला घातक ठरू शकतात. याच एक उदाहरण आहे.

आंध्रप्रदेशच्या चित्तूरमध्ये अशाप्रकारची धक्कादायक घटना घडली आहे. चित्तूरमधील अलापल्ली गावमधील दोन कुटुंबियांनी मंगळवारी टिकटॉक व्हिडिओ पाहायला. ज्यामध्ये एरंडेल ज्यूस प्यायल्याने कोरोना व्हायरसपासून तुमचा बचाव होईल असा दावा केला होता. त्यानंतर या मंडळीने एरंडेलचा ज्यूस करून प्यायले आणि ते बेशुद्ध पडले. त्यानंतर या मंडळींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार केल्यानंतर आता या सर्व लोकांची प्रकृती स्थिर असून यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

चित्तूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम पेंशलाय्या यांनी जनतेला घरगुती उपाय आणि अफवांवर विश्वासू ठेऊ नका, असं आवाहन केलं आहे. तसंच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपाय करा असं देखील सांगितलं आहे. अजूनपर्यंत कोविड-१९ वर कोणत्याही औषधाचा शोध लागला नाही आहे. अजूनही त्याबाबत शोध शुरू आहे. घरी राहा, सुरक्षित राहा आणि आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेले उपाय करा. सोशल डिस्टसिंगचे पालन करा, असं आरोग्य अधिकाऱ्यांनी जनतेला सांगितलं आहे.


हेही वाचा – CoronaVirus: सौदी अरबच्या १५० राजपुत्रांना कोरोनाची लागण!


 

First Published on: April 9, 2020 9:06 PM
Exit mobile version