CoronaVirus: जगभरात १० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण!

CoronaVirus: जगभरात १० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण!

CoronaVirus: जगभरात १० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण!

जगभरात कोरोना व्हायरस प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जगभरातील संपूर्ण देशामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. आतापर्यंत जगभरात कोरोना व्हायरसमुळे १० लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिका, इटली, स्पेश या देशात आढळले आहेत. अमेरिकेती कोरोनोग्रस्तांची संख्या २ लाखांहून अधिक आहे. त्यामुळे चीननंतर अमेरिका, इटली आणि स्पेनमध्ये कोरोना व्हायरसचा थैमान पाहायला मिळतोय.

जगात आतापर्यंत १० लाख २२ हजार १६३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ५३ हजार ४२४ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहेत. तर ३४ हजार ७१ जणांची स्थिती सध्या गंभीर आहेत. दिलास देणारी बाब म्हणजे कोरोनाचे २ लाख ९ बदार ८५२ रुग्ण हे रिकव्हर झाले आहेत.

अमेरिकेत कोरोनाचा धुमाकूळ

अमेरिकेत कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाचे २ लाख ४५ हजार ६६ रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेतील सर्वाधित कोरोनाचे रुग्ण न्यूयॉर्क शहरात आहेत. जागतिक महासत्ता अमेरिका आता कोरोनाचा संसर्गाचे केंद्र झाले आहे. अमेरिकेत ६ हजार ७५ कोरोना रुग्णाचे बळी गेले आहे.

इटलीत कोरोनाचा तांडव

अमेरिकेच्या पाठोपाठ इटलीमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. इटलीत कोरोनामुळे सर्वाधित मृत्यू होत आहेत. आतापर्यंत इटलीत १ लाख १५ हजार ४९५ कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यापैकी १३ हजार ९७४ जणांनी जीव गमावला आहे.


हेही वाचा – Coronavirus: इराणच्या सभापतींना कोरोनाची लागण


 

First Published on: April 3, 2020 8:59 AM
Exit mobile version