corona : संसर्गानंतर किती दिवसांनी दिसतात कोरोनाची गंभीर लक्षणे? जाणून घ्या

corona : संसर्गानंतर किती दिवसांनी दिसतात कोरोनाची गंभीर लक्षणे? जाणून घ्या

corona:संसर्गानंतर किती दिवसांनी दिसतात कोरोनाची गंभीर लक्षणे? जाणून घ्या

कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेमुळे देशातील एकंदर परिस्थिती अधिक बिकट होत आहे. सध्या एका दिवसात १ लाखहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. परंतु बहुतेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. दरम्यान कोरोनाचा पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक परिणामकारक असल्याचे समोर येत आहे. कारण यावेळी कोरोना विषाणुचे नवनवे अधिक गंभीर आणि घातक व्हेरियंट समोर आले आहेत. त्यामुळे तुम्हालाही कोरोनाची अगदी सौम्य लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नका. कारण एकदा कोरोना संसर्ग झाल्यास १४ दिवसांचा रिकव्हरी पीरियडमध्ये ५ व्या दिवसापासून ते १० व्या दिवसापर्यंतचे सर्व दिवस महत्त्वाचे असतात. या टाइमलाइन दरम्यान, रुग्णांना कोरोनाची गंभीर लक्षणे दिसण्यास सुरु होते. त्यामुळे डॉक्टरांकडूनही या दिवसांमध्ये रुग्णांवर बारीक लक्ष असते.

कोरोना लक्षणांवर दुर्लक्ष करु नका

कोरोना विषाणूची लागण झालेल्या बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसतात. जी घरच्या घरी अगदी आरामात नियंत्रणात आणली जाऊ शकतात. परंतु संसर्गानंतर ५ व्या दिवसापासून शरीरात दिसणाऱ्या लक्षणांचे परीक्षण करणे आणि ते समजून घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जर एखादा व्यक्ती कोरोना संसर्गातून रिकव्हर होत असेल परंतु मधल्या दिवसांत त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर काही खास गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

जशी लक्षणे तशी रिकव्हरी

संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांत कोरोनाची लक्षणे बर्‍याचदा चकवा देत असतात. या काळात, काही लोकांना सौम्य लक्षणे दिसू शकतात, तर काही लोकांमध्ये लक्षणे अजिबात दिसत नाहीत. परंतु ५ ते १० दिवसांदरम्यान शरीरात संक्रमणाची तीव्रता समजली जाऊ शकते. तज्ञांच्या मते, ५ ते १० दिवसांचा कालावधीत कोरोनाच्या गंभीर लक्षणांचा गुंतागुंत समोर येऊ शकतो. जी लक्षण तुम्हाला कोरोनानंतर झेलावी लागू शकतात. तसेच इंफेक्शनची तीव्रताही दर्शवतात त्यामुळे या लक्षणांना वेळीच जाणून घेत उपचार करणे गरजेचे आहे.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या दिवसानंतर ही लक्षणे प्रत्येक व्यक्तीवर वेगळ्या प्रकारे परिणाम करु शकतात. सामान्यत: व्हायरल इन्फेक्शनची ही एक प्रतिक्रिया मानली जाते. परंतु आता कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत असे दिसून आले आहे की, कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी इम्यून शरीरात जे अँटीबॉडीज तयार करतात यावर जर ओवर स्टिम्यूलेटेड झाल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि परिस्थिती ६ व्या किंवा ७ व्या दिवसादरम्यान सुरु होते.
त्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण ६ व्या किंवा ७ व्या दिवसापासून सुरु होते. अनेकदा काही रुग्णांची ५ व्या किंवा ६ व्या दिवसादरम्यान परिस्थिती खूप बिकट होते. त्यामुळे रुग्णाला अनेकदा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याची वेळ येते. तर बहुतेक रुग्णांना या दिवसांत प्रकृती सुधारतेय असे वाटू लागते.

या दिवसांत रुग्णांना गंभीर लक्षणांमध्ये शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होणे, अशक्तपणा, ताप येणे, चक्क येणे, श्वास घेण्यास अडचणी, अस्वस्थता, भारीपण, श्वसन प्रणालीत अडचणी जाणवू लागतात. संसर्गाचा दुसऱ्या टप्प्यात बऱ्याच रुग्णांना हायपोक्सिया या त्रासाला समोरे जावे लागते. ज्यामध्ये रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावत आहे.

दुसर्‍या आठवड्यात कोणत्या रुग्णास धोका अधिक?

शरीरात कोरोना विषाणूचा संक्रमणाची तीव्रता यापूर्वी असलेल्या आजारांवर आणि वयावर अवलंबून असते. डॉक्टर सतत सांगतात की, मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि इतर आजारांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना गंभीररित्या आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोरोना संसर्गाचा सुरुवातीच्या टप्प्यात, तरूण आणि निरोगी लोकांना देखील फुफ्फुसापर्यंत संसर्ग पोहचू नये यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत छातीचे सीटी स्कॅन, एक्स-रे आणि रक्त अहवालांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच छोट्या साधारण लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नये. कोरोना हा एक अतिशय धोकादायक व्हायरस आहे जो कोणत्याही वेळी रुग्णासाठी जीवघेणा ठरु शकतो. म्हणूनच, त्याची लक्षणे ओळखण्याची आणि वेळीच योग्य पाऊले उचलण्याची नितांत गरज आहे. दुसर्‍या लाटा दरम्यान अनेक रूग्णांना रुग्णालयात भरती करावे लागत आहे. त्यामुळे काही वाटल्यास सतत डॉक्टरांच्या संपर्कात रहा.


भारतात पुढील आठवड्यापासून Sputnik V चे डोस मिळणार- NITI AAYOG


 

First Published on: May 13, 2021 7:27 PM
Exit mobile version