दिलासादायक! यामुळे सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद असलेल्या देशात भारताचा समावेश

दिलासादायक! यामुळे सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद असलेल्या देशात भारताचा समावेश

कोरोनाचे मृत्यू

कोरोना विषाणू संबंधित एक दिलासादायक बातमी समोर आली आहेत. प्रति लाख लोकसंख्येत कोरोनाचे सर्वात कमी प्रमाण असलेल्या देशांपैकी भारत एक आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेला दिली आहे.

वृत्तसंस्था एएनआयच्या मते, आरोग्य मंत्रालयाने डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार असे सांगितले की, लोकसंख्येची घनता सर्वाधित असूनही, भारतात लाखो लोकसंख्येत कोरोनाचे प्रमाण बरेच कमी आहे. भारतात दर लाख लोकसंख्येमध्ये कोरोनाचे सरासरी ३०.०४ रुग्ण आहेत. जागतिक सरासरी ११४.६७ च्या तीन पट आहे. तर देशातील रिकव्हरी दर ५५.७७ टक्के आहे. २१ जून २०२० रोजी डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

मंत्रालयाच्या ट्विटनुसार, डिस्चार्ज आणि अॅक्टिव्ह रुग्णांमधील अंतर निरंतर वाढत आहे, गेल्या २४ तासांत ९ हजार ४४० संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत २ लाख ३७ हजार १९५ रुग्ण कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत. दरम्यान त्या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांच्या तुलनेत अॅक्टिव्ह असणाऱ्या रुग्णांच्या संख्येहून अधिक असून ती ६२ हजार ८०८ झाली आहे. देशात सध्या १ लाख ७४ हजार ३८७ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, रविवारी भारतात १४ हजार ८२१ रुग्ण आढळले तर ४४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात ४ लाख २५ हजार २८२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर मृतांची संख्या १३ हजार ६९९ वर पोहोचली आहे. देशातील संसर्गाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रात बसला असून आतापर्यंत येथे १ लाख ३२ हजार ७५ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी आतापर्यंत संसर्गामुळे ६ हजार १७० रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

तसेच, राज्यात बरे झालेल्या रूग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा जास्त आहे. येथे ६० हजार १६१ अॅक्टिव्ह रुग्णे आहेत तर ६५ हजार ७४४ रुग्ण बरे झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील रुग्णांची संख्या ५९ हजार ७४६ वर गेली आहे, तर तामिळनाडूमध्ये ५९ हजार ३७७ रुग्ण आढळले आहेत.


चीनने औषधाच्या कच्चा मालाची किंमत वाढवली
First Published on: June 22, 2020 7:42 PM
Exit mobile version