घरदेश-विदेशचीनने औषधाच्या कच्च्या मालाची किंमत वाढवली

चीनने औषधाच्या कच्च्या मालाची किंमत वाढवली

Subscribe

भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. भारतीय सीमेवरील गलवान खोर्‍यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर चीनचे ४३ सैनिक मारले गेले आहेत. या धमुश्चक्रीनंतर चीन आता आर्थिक पातळीवरही भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. याकरता औषधनिर्मितीसाठी लागणार्‍या कच्चा मालाच्या किंमती चीनने वाढवली आहे.

भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. भारतीय सीमेवरील गलवान खोर्‍यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर चीनचे ४३ सैनिक मारले गेले आहेत. या धमुश्चक्रीनंतर चीन आता आर्थिक पातळीवरही भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. याकरता औषधनिर्मितीसाठी लागणार्‍या कच्चा मालाच्या किंमती चीनने वाढवली आहे. भारताचे फार्मा क्षेत्र पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. भारतीय औषध कंपन्या त्यांच्या गरजेच्या ७० टक्के एपीआय चीनकडून आयात करतात. गलवान खोर्‍यात झालेल्या हिंसाचारानंतर चीनने या उत्पादनांच्या किंमती वाढवण्यास सुरुवात केली आहे.

भारत चीनवर अनेक बाबींसाठी अवलंबून आहे. त्यामुळे आता चीनकडून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. भारत दरवर्षी सुमारे ३९ अब्ज डॉलर्स किमतीचे औषध तयार करतो. औषध तयार करण्यासाठी आवश्यक स्टार्टिंग मटेरियल, एपीआयसाठी भारत मुख्यत्वे चीनवर अवलंबून आहे. भारताने आर्थिक वर्ष २०१९ मध्ये चीनकडून सुमारे १७,४०० कोटी (२.५ अब्ज डॉलर्स) एपीआय आयात केले होते. भारत जगातील तिसरा मोठा औषध उत्पादक देश आहे. डॉक्टर रेड्डी लॅब, ल्युपिन, ग्लेनमार्क फार्ममा, मायलन, झाइडस कॅडिला आणि पीफायझर सारख्या भारतातील आघाडीच्या औषध कंपन्या एपीआयसाठी मुख्यतः चीनवर अवलंबून आहेत.

- Advertisement -

वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत फार्मास्युटिकल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष दिनेश दुआ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गलवान खोर्‍यातील घटनेसंदर्भात चीन दोन प्रकारे हल्ला करत आहे. एकीकडे तो सीमेवर हल्ला करीत आहे आणि दुसरीकडे भारत अवलंब असल्याचा गैरफायदा घेऊ लागला आहे. एपीआयच्या किंमती वाढल्याने औषधांच्या किमती वेगाने वाढू लागल्या आहेत. पॅरासिटोमलची किंमत २७ टक्के, सिप्रोफ्लोक्सासीनची किंमत २० टक्के, पेनिसीलींग जीची किंमत २० टक्के याच्या किंमतीत वाढ झाली आहे. याशिवाय प्रत्येक प्रकारच्या फार्मा प्रोडक्टच्या किंमतीत जवळपास २० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -