Coronavirus In India: RTPCR चाचणी निगेटिव्ह येऊनही लक्षणे दिसतायत? एम्स संचालकांनी दिला ‘हा’ सल्ला

Coronavirus In India: RTPCR चाचणी निगेटिव्ह येऊनही लक्षणे दिसतायत? एम्स संचालकांनी दिला ‘हा’ सल्ला

Coronavirus In India: RT PCR चाचणी निगेटिव्ह येऊनही लक्षणे दिसतायत? एम्स संचालकांनी दिला 'हा' सल्ला

देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून अनेक रुग्णांची RTPCR चाचणी निगेटिव्ह येऊनही लक्षणे दिसत असल्याचा घटना समोर आल्या आहेत. यावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) चे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, RTPCR चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येऊनही कोरोनाची लक्षणे दिसल्यास काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान देशात आढळणाऱ्या कोरोनाचा नवा स्ट्रेन RTPCR चाचणीला चकवा देत आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे असूनही अनेक रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे निगेटिव्ह रुग्णांची संख्या अधिक वाढतेय.

यावर कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य आणि एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया सांगितले की,RTPCR चाचणी निगेटिव्ह असूनही कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांवर प्रोटोकॉलनुसार उपचार केले पाहिजेत. कारण कोरोनाचा हा नवा स्ट्रेन अधिकच गंभीर आहे. नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात एखादा निगेटिव्ह व्यक्ती आल्यास त्याही व्यक्तीला १ मिनिटात कोरोनाचे संक्रमण होऊ शकते.

वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे चाचणी अहवालातही उशीर होत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी क्लिनिको-रेडिओलॉजिकल डायग्नोसिस केले पाहिजे. जर सीटी स्कॅनदरम्यान कोरोनाची लक्षणे दिसल्यास प्रोटोकॉलअंतर्गत रुग्णावर उपचार सुरू केले पहिजेत. कोरोनाच्या लक्षणांमध्ये चव आणि गंध कमी होणे, थकवा, ताप येणे आणि थंडी वाजणे, आंबटपणा किंवा गॅसची अडचण, घसा खवखवणे यांचा समावेश आहे.

बनावट RTPCR चाचण्याची संख्या का वाढतेय?

तज्ज्ञांचे मत, RTPCR चाचणी अनेकदा स्वॅबिंगद्वारे चुकीच्या पद्धतीने केली जाते. स्वॅब घेण्याचा चुकीची पद्धत, स्वॅब नीट स्टोर न करणे, सॅपलची चुकीच्या पद्धतीने ट्रांसपोर्टेशन यामुळे कोरोना चाचणी निगेटिव्ह येत आहे. यासह, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की. म्यूटेड कोरोना व्हायरसमुळे अनेकदा रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येत आहे. तसेच शरीरातील इम्युनिटी डबल म्यूटेंट व्हायरसला ओळखू शकत नसल्याने कोरोना संक्रमण वेगाने पसरत आहे. त्यामुळे सध्या वापरण्यात येणाऱ्या RTPCR चाचण्यांमध्ये म्यूटेड व्हायरस ओळखणे कठीण जात आहे.


 

First Published on: April 28, 2021 4:20 PM
Exit mobile version