Live Update: जैश ए मोहम्मदच्या टॉपच्या अतिरेक्याचा काश्मिरमध्ये खात्मा

Live Update: जैश ए मोहम्मदच्या टॉपच्या अतिरेक्याचा काश्मिरमध्ये खात्मा

Live update Mumbai Maharashtra

जम्मू-काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदचा टॉपचा दहशतवादी अबू सैफुल्लाचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. पुलवामा हल्ल्यात अबू सैफुल्लाचा हात होता, ज्यात ४० जवान शहीद झाले. अबू सैफुल्ला ऊर्फ अदनान ऊर्फ इस्माईल, ऊर्फ लंबू अशा विविध नावानं काश्मिर घाटीत ओळखला जात होता. पुलवामा जिल्ह्यातल्या त्रालच्या हंगरमर्गमध्ये एन्काऊंटर दरम्यान मारला गेला असल्याचे सांगितले जात आहे.


नागपुरात कडबी-गोळीबार चौक उड्डाणपुलाचं भुमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन


राज्यात नैसर्गिक आपत्तींवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावर भर दिला पाहिजे – मुख्यमंत्री


उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू

महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप मोहिले असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. दिलीप मोहिले हे उल्हासनगर महापालिकेच्या विद्युत विभागात टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी मोहिले हे उल्हासनगरच्या कॅम्प ३ भागात महावितरणच्या खांबावर दुरुस्ती करत होते. यावेळी जोरदार झटका त्यांना बसला आणि ते जागीच कोसळले. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.


केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. राज्याला भरीव मदत मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्य असा भेदभाव न करता मदत मिळाली पाहिजे, असं सांगतानाच केंद्र सरकारने मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे


शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी १ वाजता त्यांच्या पार्थीवावर शेतकरी सहकारी सुतगिरणी सांगोला येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी साडे ११ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात होणार असून दुपारी १ वाजता सांगोला येथील शेतकरी सहकारी सुतगिरणी येथे गणपतराव देशमुख यांच्या पार्थीवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.


भरधाव वेगाने ठाण्याकडे येणाऱ्या कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून तो रस्त्याच्या दुभाजकाला धडकला. ही धडक इतकी जोरात होती की तो कंटेनरने पुन्हा ठाण्याकडून बोरिवली दिशेकडे निघालेल्या केमिकल टँकरला धडकल्याची घटना शनिवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.या विचित्र घटनेत दोन्ही चालक जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ ठाणे,कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


देशात गेल्या २४ तासात ४१ हजारांहून अधिक नवे कोरोना बाधित तर ५९३ जणांचा कोरोनाने बळी.(सविस्तर वाचा)


सामूहिकरित्या जीएसटी भरायला नकार द्या, मग बघा उद्धव ठाकरेच नव्हे, तर नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील, असं आवाहन खुद्द पंतप्रधान मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना केलं.


कोयना धरणातून विसर्ग वाढवल्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आमणापूर पुलावर पाणी येण्यास सुरुवात. कोयना धरणाचा विसर्ग गुरुवारपासून ५० हजार क्यूसेकने वाढवण्यात आला. त्यामुळे सांगलीतील पलुस तालुक्यातील नदीकाठच्या गावांना इशारा.

First Published on: July 31, 2021 8:40 AM
Exit mobile version