Live Update: राज्यात पूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत १९२ जणांचा मृत्यू

Live Update: राज्यात पूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत १९२ जणांचा मृत्यू

Live update Mumbai Maharashtra

राज्यात पूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत १९२ जणांचा मृत्यू, तर ३ लाखाहून अधिक नागरिकांचे स्थलांतर,


राज कुंद्रा अश्लील फिल्म प्रकरणी गुन्हे शाखेकडून अभिनेत्री शर्लिन चोप्राला समन्स, चौकशीस हजर राहण्याचे आदेश


राज्य सरकारने सर्व रस्त्यांची पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे अशोक चव्हाण यांचे निर्देश


ऱाज्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण बैठक, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज ४.३० वाजता ही बैठक पार पडणार आहे, यावेळी राज्यातील आपत्तीव्यवस्थापनेतील मुख्य अधिकारी आणि महाविकास आघाडीत महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.


येत्या दोन दिवसांत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निर्णय घेऊ, राज्यात पुरामुळे ७ जिल्हे बाधित- उपमुख्यमंत्री


पुणे-बंगळुरू महामार्ग केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरु

पुणे-बंगळुरू महामार्ग केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरु करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांनी या विषयी माहिती दिली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर अजूनही एक ते दीड फुट पाणी आहे. जेसीबीच्या साहाय्याने महामार्गावरील अडथळे दुर करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.


मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे कोयनानगर परिसरातून माघारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त सातारा जिल्ह्याला भेट देऊन पाहणी करणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर कोयनानगर परिसरातून माघारी आल्याचे सांगितले जात आहे. सातारा आणि कोयनानगर परिसरात जोरदार पाऊस आणि खराब हवामान यामुळे कोयनानगरातील हेलिपॅडवर लँड होऊ न शकल्याने हे हेलिकॉप्टर पुणे विमानतळाकडे माघारी घेण्यात आले आहे.


पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवाल

मदत व पुनर्वसन विभागाने आज दि २६ जुलै सकाळी ११ वाजता दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे २ लाख २९ हजार ७४ लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे.

एकूण १६४ मृत्यू झाले असून २५,५६४ जनावरांचे मृत्यू आहेत.
एकंदर ५६ लोक जखमी असून १०० लोक बेपत्ता आहेत
१०२८ गावे बाधित. निवारा केंद्रे २५९, निवारा केंद्रातील लोक ७८३२,


कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. “मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. जेवल्यानंतर राज्यपालांना भेटू” असं त्यांनी कर्नाटक सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सोहळ्यात सांगितले.


कोकणातील नागरिकांना विशेष मदत केली पाहिजे, जनतेचा आक्रोश संकट काळात समजून घेतला पाहिजे – देवेंद्र फडणवीस


पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांना तात्काळ मदत जाहीर केली पाहिजे – फडणवीस


खराब हवामानामुळे अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूरचा नियोजित दौरा रद्द झाला आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला परवानगी नाकारण्यात आल्याने अजित पवार यांचा दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कोल्हापूरला जाण्याऐवजी अजित पवार सांगलीला रवाना झाले आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त सातारा जिल्ह्याला भेट देऊन पाहणी करणार आहेत. साताऱ्यातील कोयनानगर येथील पूरग्रस्तांच्या निवारा छावणीला ते भेट देणार आहेत.


भिलवडी (ता. पलूस, जि. सांगली) येथील पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पुरग्रस्तांना ठेवण्यात आलेल्या निवारा केंद्राला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. पाणी भरलेल्या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम देखील उपस्थितीत होते


कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली परिसरातील घरे, रस्ते पूरात पाण्यात


सोमवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३९,३६१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. ४१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ३५,९६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


देशात आज २२ वा कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. यानिमित्त देशाचे राष्ट्रपती आणि सशस्त्र सैन्याचे सर्वोच्च कमांडर रामनाथ कोविंद आज द्रासमधील कारगिल वॉर मेमोरियल येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार होते. मात्र खराब वातावरणामुळं हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.


राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये आग, राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षामध्ये आग (सविस्तर वाचा)


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करतील तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधतील. सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात भूस्खलन झाले असूनमौजे आंबेघर आणि मौजे मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी १०.४५ वाजता पुण्याहून कोयनानगर कडे हेलिकॉप्टरने रवाना होतील.


हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील सांगला परिसरात रविवारी दरड कोसळून झालेल्या अपघातात नागपूरच्या प्रतीक्षा पाटील या तरुणीसह ९ पर्यटकांचा मृत्यू झालाय. तर तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे रविवारी रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू होते.


देशात आज २२ वा कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त राष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेकांनी शहीद जवानांना अभिवादन केले. १९९९ मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. ज्यामध्ये भारताने विजय मिळवला होता

First Published on: July 26, 2021 7:50 PM
Exit mobile version