Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग; राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षामध्ये आग

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग; राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षामध्ये आग

Related Story

- Advertisement -

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षामध्ये सोमवारी सकाळी ही आग लागली. शॉर्ट सर्किट हे या आगीचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्यपालांसह मुख्यमंत्री या आरक्षित कक्षात येत असतात. महाराष्ट्र सदन हे महत्त्वाचं ठिकाणं असून ही आग लागल्यानंतर संपूर्ण यंत्रणा तेथे हजर झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. राज्यपालांसाठी आरक्षित असलेला कक्ष हा वेगळ्या ठिकाणी असल्याने इतर कोणत्याही कक्षाात ही आग लागली नाही. असे असले तरी इतर खबरदारीच्या उपाययोजना याठिकाणी घेण्यात आल्या असल्याची माहिती मिळतेय. ही घटना घडल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि ही घटना नेमकी कशी घडली याचा पंचनामा पोलिसांकडून सध्या सुरू आहे.

- Advertisement -

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग सकाळी साधारण साडेनऊ वाजेच्या सुमारास लागली. महाराष्ट्र सदनातील जवानांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -