Coronavirus India Updates: चिंताजनक! सलग तिसऱ्या दिवशी २ लाखांहून अधिक रुग्णवाढ, एकाच दिवसात १,३४१ जणांचा मृत्यू

Coronavirus India Updates: चिंताजनक! सलग तिसऱ्या दिवशी २ लाखांहून अधिक रुग्णवाढ, एकाच दिवसात १,३४१ जणांचा मृत्यू

Coronavirus India Updates: चिंताजनक! सलग तिसऱ्या दिवशी २ लाखांहून अधिक रुग्णवाढ, एकाच दिवसात १,३४१ जणांचा मृत्यू

देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात २ लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. एवढेच नाहीतर कोरोना काळाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत पहिल्यांदा १,३४१ जणांचा मुत्यूची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात २ लाख ३४ हजार ६९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार ३४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ लाख २३ हजार ३५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ४५ लाख २६ हजार ६०९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ७५ हजार ६४९ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १६ लाख ७९ हजार ७४० जणांवर उपचार सुरू आहेत.

देशभरात आतापर्यंत ११ कोटी ९९ लाख ३७ हजार ६४१ जणांचा कोरोना लसीकरण पार पडले आहे. १६ एप्रिलपर्यंत देशभरात २६ कोटी ४९ लाख ७२ हजार २२ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहे. यापैकी काल दिवसभरात १४ लाख ९५ हजार ३९७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात ६३ हजार ७२९ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३९८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३७ लाख ३ हजार ५८४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५९ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल दिवसभरात ४५ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३० लाख ४ हजार ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – Corona vaccine तयार करण्यास वर्षभराचा कालावधी लागणार- Haffkine


 

First Published on: April 17, 2021 10:14 AM
Exit mobile version