Coronavirus: भारत आणि ब्राजीलला मागे टाकत इंडोनेशिया बनला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

Coronavirus: भारत आणि ब्राजीलला मागे टाकत इंडोनेशिया बनला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

Coronavirus : कोरोना महमारीने भारतीयांचे आयुर्मान दोन वर्षांनी घटले, IIPS चा अहवाल

गेल्या वर्ष दीड वर्षापासून पासून कोरोना व्हायरसचं संकट देशावर कायम आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरीही कोरोना अद्याप पूर्णपणे गेला नाहीये. अशातच गेल्या वर्षापासून भारत आणि ब्राझिलमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा आकडा इतर देशांच्या तुलनेत झपाट्याने वाढत होता. पण आता नुकतच समोर आलेलया माहितीनुसार इंडोनेशियामध्ये कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली झाली आगे. भारतातील कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीला मागे टाकत इंडोनेशिया आता कोरोनाचा नवा हॉटस्पॅट बनला आहे. यामुळे इंडोनेशियामध्ये अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. इंडोनेशियामध्ये कोरोना व्हायरसमधील डेल्टा वेरीयंटचे रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इंडोनेशियामध्ये दररोज 75 हजार पेक्षाही जास्त रुग्णांची नोंद करण्यात येते. तसेच शुक्रवारी 1205 रुग्णांच्या मृतांच्या नोंदणी करण्यासह इडोनेशियामध्ये 71 हजारांचा कोरोना बाधीत मृतांचा आकडा पार करण्यात आला आहे.

कोरोना महामारीच्या सुरुवातीनंतर इंडोनेशियामध्ये एकूण 545 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. हॉस्पिटल असोशियन चे महासचिव डॉक्टर लिया जी पर्ताकुसुमा यांच्या माहितीनुसार इंडोनेशियामध्ये जेव्हापासून कोरनाचा शिरकाव झाला आहे तेव्हापासून एकूण दहा टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना आईसोलेट करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता पाच टक्‍क्‍यांनी अधिक वाढली आहे.

इंडोनेशियाची एकूण लोकसंख्या 27 कोटी इतकी असून भारतामध्ये एका महिन्याला जेवढ्या कोरोना रुग्णसंख्येची नोंद करण्यात येत होती त्यापेक्षाही जास्त एका दिवसात कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा इंडोनेशियामध्ये वाढताना दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या मते लवकरच ही परिस्थिती कंट्रोल केले नाही तर आरोग्य व्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो. इतकचं नाही तर वेळीच आवर घातला नाही तर भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. इंडोनेशिया चे स्वास्थ्य मंत्री बूदी सादिकिन यांनी सांगितल्याप्रमाणे देशभरामध्ये अजूनही रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीये. पण डेल्ट वेरीयंटच्या प्रकोपामुळे प्रांतात कोरोना संक्रमणाचे अधिक रुग्ण समोर येत आहे.


हे हि वाचा – Covid 19: भारतीय नागरिकांना रोजगार आणि पर्यटक म्हणून ‘या’ देशांत जाण्यास परवानगी!

 

First Published on: July 19, 2021 12:27 PM
Exit mobile version