धक्कादायक! Corona मुळे फुफ्फुसांमध्ये होतायत रक्ताच्या गाठी; नवं संशोधन

धक्कादायक! Corona मुळे फुफ्फुसांमध्ये होतायत रक्ताच्या गाठी; नवं संशोधन

जगभरासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरू आहे. कोरोनाची औषधं आणि लस अद्याप देशात उपलब्ध झालेली नाही. दरम्यान कोरोनावर अभ्यास होत असताना अनेक संशोधनं देखील समोर आले आहेत. बाधितांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील तितकीच वाढत आहे. मात्र पुन्हा एकदा वेगानं हा संसर्ग पसरून दुसरी लाट येणार का? अशी चिंता व्यक्त केली जात असताना आता धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे.

देशात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे परंतु अद्याप धोका टळला नाही. बर्‍याच राज्यात, कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढताना दिसतोय. कोरोना साथीच्या विषयी माहिती गोळा करणारे शास्त्रज्ञांनी हा विषाणू प्रथम संक्रमित रूग्णांच्या फुफ्फुसांना नुकसान पोहोचवल्याचे समोर आले आहे. कोरोना झाल्यानंतर सर्वात जास्त धोका हा फुफ्फुसांना असतो. अनेकदा रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये रक्ताच्या गाठी होतात त्यामुळे श्वसनासाठी त्रास होतो आणि रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. हरियाणा आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनामुळे रुग्णांच्या मृत्यूच्या तपासणीच्या वेळी हा खुलासा करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी असे सांगितले की, कोरोना संक्रमित रूग्णांच्या छातीत हा संसर्ग दिसल्यानंतर त्यांच्या सीटीस्कॅन करण्यात आला. ७५ टक्क्यांपर्यंत फुफ्फुसांमध्ये हा संसर्ग पसरला असेल तर त्यातून रुग्णाचे प्राण वाचवणं शक्य असतं मात्र त्यानंतर हे आव्हानात्मक काम होत जातं, असे सांगितले जात आहे.


‘सैनिक आहेत म्हणून देशात सण साजरे होतायत’
First Published on: November 14, 2020 4:52 PM
Exit mobile version