कोरोना व्हायरसच्या बचावासाठी ‘हे’ मास्क वापरणं सर्वोत्तम!

कोरोना व्हायरसच्या बचावासाठी ‘हे’ मास्क वापरणं सर्वोत्तम!

N95-mask

कोरोना व्हायरस आणि मास्क यावर झालेल्या १७२ अभ्यासाच्या विश्लेषणाने काही महत्वाची बाबी समोर आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) या प्रकल्पाला अर्थसहाय्य दिले. विश्लेषणात असे आढळले की, जीवघेण्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी एन ९५ आणि इतर रेस्पिरेटर मास्क, कपड्याचे मास्क किंवा सर्जिकल मास्कपेक्षा चांगले असल्याचे सांगण्यात येत आहे.

मास्क संदर्भातील अभ्यासाचे विश्लेषण The Lancet मासिकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, या नव्या विश्लेषणानंतर, डब्ल्यूएचओने अशी शिफारस करावी की, नागरिकांनी किंवा डॉक्टर आणि परिचारिका, विशेषत: आवश्यक सेवांशी संबंधित लोकांनी सर्जिकल मास्कऐवजी एन ९५ मास्क आवर्जून वापरावे.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर डेव्हिड माइकल्स यांनी असे सांगितले, हे खूप निराशाजनक आहे की, डब्ल्यूएचओ आणि अमेरिका का सेंटर फॉर डिजीज कंट्रोलने केलेल्या शिफारसीनुसार सर्जिकल मास्क पुरेसे आहेत मात्र ते योग्य नाही. गार्डियनच्या अहवालानुसार, एन ९५ मास्कच्या कमतरतेमुळे बर्‍याच देशांनी लोकांना साधे मास्क वापरण्याचा सल्ला देखील दिला आहे.

सर्जिकल मास्कवर अवलंबून राहून बऱ्याच कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे यात शंका नाही, असे डेव्हिड माइकल्स यांनी सांगितले तर विश्लेषणामध्ये असेही दिसून आले की, एन ९५ चे मास्क कोरोनाच्या संसर्गापासून ९६ टक्के संरक्षण करते.  या विश्लेषणातून असे दिसून आले की, केवळ ७७ टक्के सर्जिकल मास्क कोरोनापासून संरक्षण करतात. दरम्यान बहुतेक देश अर्थव्यवस्था सुरळीत कऱण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना हे विश्लेषण खूप महत्वाचे ठरतेय.

केवळ आरोग्य सेवा कामगारच नव्हे तर अशा उच्च जोखमीच्या क्षेत्रात काम करणारे लोक जसे की मांस पॅकेजिंग करणारे कर्मचारी, शेतात काम करणारे कामगार, एन ९५ चे मास्क वापरून कोरोना पासून संरक्षण मिळवू शकतात. तसेच डब्ल्यूएचओने अद्याप सर्व देशांतील लोकांना मास्क घालण्याची शिफारस केलेली नाही. परंतु अनेक देशांमध्ये मास्क घालणे अनिवार्य केले आहे. त्याच वेळी, अनेक तज्ज्ञांनी देखील मास्क संदर्भात डब्ल्यूएचओच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. बरेच तज्ज्ञांचे मत आहे की, मास्क कोरोना रोखण्यासाठी एक उत्तम साधन आहे.


रशियामध्ये प्रथमच कोरोनावरील औषधाचा वापर होणार!
First Published on: June 2, 2020 10:00 PM
Exit mobile version