लॉकडाऊनमध्ये हा राजा आपल्या २० गर्लफ्रेंडसोबत गेलाय हॉटेलमध्ये रहायला!

लॉकडाऊनमध्ये हा राजा आपल्या २० गर्लफ्रेंडसोबत गेलाय हॉटेलमध्ये रहायला!

सध्या जगभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. २०० हून अधिक देशात सध्या कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे अनेक देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. लोकांनी घरातच बसावं, त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य होईल असे वेळोवेळी लोकांना सांगण्यात येत आहे. मात्र राजानेच आपण केलेला नियम मोडला तर…हे खरं आहे. लॉकडाऊनचा नियम एका राजानेच तोडला आहे. ६७ वर्षीय थायलंडचा राजाने लॉकडाऊनचा नियम मोडला आहे.

या थायलंडच्या राजाने आत्तापर्यंत अनेक लग्न केले आहेत. पण जसजसा देशातील कोरोनाचा धोका वाढत गेला तसा राजाने आपला देश सोडला. या राजाने आपल्या २० गर्लफ्रेंडबरोबर एका हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार राजाला जेव्हा सेलेब्रेशन करावेसे वाटले तेव्हा त्याने लॉकडाऊनचा नियम तोडून सेलेब्रेशन केलं.

थायलंडच्या या राजाचं नाव आहे, महा वजिरालॉन्गकोर्न. मार्चमध्ये आलेल्या बातमीनुसार हा राजा बँकॉकपासून लांब जर्मनीजवळ एका हॉटेलमध्ये रहात आहेत. त्यांच्याबरोबर २० गर्लफ्रेंड आहेत. त्यांच्या म्हणण्यानूसार त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. आता लॉकडाऊन तोडून हॉटेलमध्ये राहणाऱ्या राजावर सोशल मीडियावर टीका होत आहे. आता या राजाला शिक्षा होणार का याकडे सगळ्यांच लक्ष आहे.


हे ही वाचा – वर्क फ्रॉम होम करताना मुलांची लुडबूड? मग हे करून बघा!


 

First Published on: April 13, 2020 10:16 PM
Exit mobile version